
Dattatray Bharane Official
May 26, 2025 at 04:54 AM
मागील दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
आज सकाळी भिगवण (ता. इंदापूर) येथे भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. या संकटसमयी प्रशासन नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.
या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून नुकसानग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर मदतीचा लाभ मिळू शकेल.