
Dattatray Bharane Official
May 26, 2025 at 12:35 PM
मागील दोन दिवसांपासून इंदापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनी, घरे तसेच जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
आज थोडीशी उघडीक मिळाल्यानंतर मी नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला.
याच दरम्यान, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीदेखील इंदापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व नागरिकांना धीर दिला.
राज्य सरकार नागरिकांच्या पाठीशी ठाम उभं आहे. प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, नागरिकांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे.
या संकटाच्या काळात प्रत्येक गरजू नागरिकापर्यंत मदतीचा हात पोहोचवण्यासाठी प्रशासन आणि सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे.