Dattatray Bharane Official
Dattatray Bharane Official
June 3, 2025 at 03:35 PM
राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या “जनता संवाद” या उपक्रमात आज सहभाग घेतला. या अभिनव उपक्रमाद्वारे नागरिकांना त्यांच्या अडचणी व समस्या थेट मांडण्याची संधी मिळते. यामुळे आम्हालाही त्यांच्या व्यथा जवळून समजून घेता येतात, आणि त्यावर तातडीने उपाययोजना करता येते. दरबारात आलेल्या नागरिकांच्या तक्रारी काळजीपूर्वक ऐकून घेतल्या. संबंधित अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधून आवश्यक त्या कार्यवाहीच्या सूचना दिल्या. जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.

Comments