
Dattatray Bharane Official
June 20, 2025 at 04:52 PM
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव – बारामती
आज बारामती येथे श्री विश्वास नाना देवकाते यांच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांच्या कार्याचा व प्रेरणादायी जीवनाचा गौरव करत विविध कार्यक्रम पार पडले.
यावेळी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच पुण्यश्लोक नारीशक्ती पुरस्कार देऊन महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यात आला.