
Rahul Narwekar
May 24, 2025 at 09:53 AM
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जोरदार प्रत्यूत्तर दिले. भारतीय सेनेने आपल्या पराक्रमाने दहशतवाद्यांचे ५ आतंकवादी तळ उध्वस्त केले. याच भारतीय सेनेच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी सबंध भारतभर तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर कुलाबा येथील बॅकबे डेपो ते शिवशक्ती नगरपर्यंत तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संपूर्ण वातावरण देशभक्तीने भारलेले होते. भारत माता की जय व वंदे मातरम् या घोषणांनी सगळा परिसर दुमदुमून गेला होता. भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या वाईट शक्तींना हा संदेश आहे की आम्ही सर्व भारतीय एक आहोत व तुम्हाला उत्तर देण्यासाठी आमची भारतीय सेना सज्ज आहे.
यावेळी माजी नगरसेवक श्री. मकरंद नार्वेकर जी, माजी नगरसेविका श्रीमती. हर्षिता नार्वेकर जी देखील उपस्थित होते.
भारत माता की जय!
👍
1