Rahul Narwekar
Rahul Narwekar
May 26, 2025 at 12:46 PM
पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सेनेने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत दहशतवाद्यांचा यशस्वी खात्मा केला. आपल्या शौर्याने त्यांनी देशवासीयांचे मस्तक अभिमानाने उंचावले. सेनेच्या या पराक्रमाला सलाम करण्यासाठी देशभरात तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कुलाबा येथील मीनारा मस्जिद ते क्रॉफर्ड मार्केट या मार्गावर भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. हातात तिरंगा, मनात देशभक्ती आणि ओठांवर ‘भारत माता की जय’चा जयघोषाने संपूर्ण परिसर देशप्रेमाच्या रंगात रंगून गेला. शूर वीरांना नमन, आणि एकजूट हीच भारताची ओळख आहे, हाच संदेश ही तिरंगा यात्रा देऊन गेली!

Comments