
Pankaj Rahangdale ✅
June 15, 2025 at 05:04 PM
गोरेगाव तालुका | भारतीय जनता पार्टी
"संकल्प से सिद्धी" - केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या प्रेरणादायी कार्याचा आढावा
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ११ यशस्वी वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी, गोरेगाव तालुकातर्फे “संकल्प से सिद्धी” अंतर्गत प्रेरणादायी सेवा कार्याचा आढावा घेणारी विस्तारित बैठक आज उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत गेल्या ११ वर्षांतील केंद्र शासनाच्या जनहितकारी योजना, विकासकामे व धोरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच हे कार्य घरोघरी पोहोचविण्यासाठी विशेष समितीचे गठन करण्यात आले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
यावेळी मा. सीताताई रहांगडाले – जिल्हा अध्यक्ष, भाजप, मा. बाळाभाऊ अंजनकर – भंडारा-गोंदिया संयोजक, मा. हेमंतजी पटले – माजी आमदार, मा. लक्ष्मणजी भगत – सभापती, जि.प. भंडारा, मा. चित्रकलाताई चौधरी – सभापती, पंचायत समिती गोरेगाव, मा. गिरधारीजी बघेले – सभापती, कृ.उ.बा.स. गोरेगाव, मा. अनंताजी ठाकरे – तालुका अध्यक्ष, गोरेगाव, मा. शैलेशजी नंदेश्वर – जि.प. सदस्य गोरेगाव मंडळाचे सर्व पदाधिकारी व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
-
पंकज रहांगडाले
माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया
