Dilip Walse Patil

6.4K subscribers

Verified Channel
Dilip Walse Patil
May 23, 2025 at 10:46 AM
आपल्या मतदारसंघातील आमोंडी- फलकेवाडी (त्रिवेणीवाडी) येथील श्री गणेश मंदिराच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम ज्ञानयज्ञ या भक्तिपूर्ण धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला. या दिव्य प्रसंगी भगवान यज्ञनारायणाचे दर्शन घेऊन त्यांच्या पावन आशीर्वादाची अनुभूती घेतली. यज्ञमंडपातील अखंड हरिनाम संकीर्तन, ज्ञानयज्ञाचे पवित्र वातावरण आणि श्रद्धाळू भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती यामुळे वातावरण पूर्णतः अध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मकतेने भारलेले होते.तसेच येथील मा. सरपंच वै. भिकाजी शंकर फलके यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या ‘त्रिवेणीवाडी सभागृह’ व कै. अविनाश नथुजी फलके यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या ’त्रिवेणीवाडी प्रवेशद्वार’ या दोन्ही वास्तूंचा लोकार्पण सोहळा माझ्या हस्ते पार पडला. या दोन्ही वास्तू ग्रामस्थांच्या विविध उपक्रमांना चालना देण्यास लोकोपयोगी ठरेल असा मला विश्वास आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व आयोजक मंडळींचे मनःपूर्वक अभिनंदन. यावेळी विष्णू काका हिंगे, माजी सभापती प्रकाशराव घोलप, माजी सभापती संजय गवारी, मंचर बाजार समितीचे सभापती निलेश थोरात, माजी उपसभापती नंदकुमार सोनावले, सरपंच आरतीताई कोतवाल, उपसरपंच धनंजय फलके यांच्यासह भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🙏 1

Comments