Dilip Walse Patil
June 15, 2025 at 03:46 AM
वडील म्हणजे केवळ एक नातं नव्हे, तर आपल्यासाठी अढळ आधार असतो. त्यांच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक निर्णयात आपल्या भल्याचा विचार असतो. त्याग, शिस्त, आणि निस्वार्थ प्रेमाचा मूर्तिमंत अवतार म्हणजे वडील.
आज जागतिक पितृदिन साजरा करत असताना, मला माझ्या वडिलांची आदरणीय दादांची आठवण होत आहे. त्यांनी आयुष्यभर आपल्यासमोर समाजसेवेचा आणि निस्वार्थ कार्याचा आदर्श ठेवला. कोणतंही पद असो वा जबाबदारी, त्यांनी कधीही स्वार्थाचा विचार न करता नेहमीच सामान्य जनतेच्या हितासाठी कार्य केलं.
गोर-गरीब, उपेक्षित, दुर्बल घटकांपर्यंत मदत पोहोचवणं आणि पदाचा उपयोग केवळ लोककल्याणासाठी करणे, ही त्यांची शिकवण होती. कुठलाही आकस न बाळगता, प्रत्येकाशी समानतेने वागणं हा त्यांच्या स्वभावाचा स्थायीभाव होता.
आम्हीही आज त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. वडील हे फक्त कुटुंबाचे नाही, तर समाजाचेही मार्गदर्शक असू शकतात, हे आम्ही त्यांच्या कडून शिकलो.
आजच्या दिवशी सर्व वडिलांना मन:पूर्वक अभिवादन!
जागतिक पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

❤️
🙏
4