Dilip Walse Patil

6.4K subscribers

Verified Channel
Dilip Walse Patil
June 20, 2025 at 11:34 AM
आंबेगाव तालुक्यातील प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव (जुन्नर फाटा) यांच्या मार्फत सन 2025-26 या आर्थिक वर्षात ‘न्यूक्लिअस बजेट’ योजनेअंतर्गत अनुसूचित जमातींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी होत आहे. यामध्ये वैयक्तिक तसेच बचतगट व सहकारी संस्थांसाठी रोजगार निर्मिती, लघुउद्योग, पर्यटन व्यवसाय, मध संकलन, खेकडा बीज तयार करणे, ढाबा व्यवसाय, मासेपालन आदी उपक्रमांसाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या योजनेमधील लाभार्थ्यांना मिरची कांडप यंत्र, शितपेटी, वजन काटा, स्वयंपाकाची भांडी, मंडप साहित्य, लाऊडस्पीकर, केटरिंग यंत्रणा, वीटभट्टी, बेंजो साहित्य अशा १७ पेक्षा अधिक योजनांचा लाभ अनुसूचित जमातीच्या लाभार्थींना घेता येणार आहे. या योजनांमध्ये आदिम जमाती, विधवा, परित्यक्ता, अपंग, महिला, अल्प उत्पन्न गट यांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. अर्जदाराकडे जातीचा दाखला अनिवार्य असून, पेसा क्षेत्रासाठी ग्रामसभेचा ठराव आवश्यक आहे. या संपूर्ण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, सरकारसोबत मीही कटिबद्ध आहे. त्यांच्या आत्मनिर्भर भविष्यासाठी हे पाऊल निर्णायक ठरेल, याची मला पूर्ण खात्री आहे. पात्र लाभार्थींनी [www.nbtribal.in] (http://www.nbtribal.in) या संकेतस्थळावर दिनांक 15 जुलै 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज भरावा. अर्ज सादर करताना “घोडेगाव प्रकल्प कार्यालय” व संबंधित योजना निवडून माहिती भरावी. अर्ज करताना अडचण आल्यास प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा.
Image from Dilip Walse Patil: आंबेगाव तालुक्यातील प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घो...
❤️ 1

Comments