Dilip Walse Patil
                                
                                    
                                        
                                    
                                
                            
                            
                    
                                
                                
                                June 21, 2025 at 05:52 AM
                               
                            
                        
                            जलसमृद्धीकडे निर्णायक वाटचाल! 
आपल्या आंबेगाव तालुक्यातील डोंगराळ व आदिवासी भागासाठी फुलवडे व बोरघर या उपसा सिंचन योजनांना जलसंपदा विभागाच्या पंपिंग मशिनरीला स्थायी समितीने मंजुरी दिली असून, ही योजना या भागाच्या समृद्ध भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे. यासोबतच कळमजाई उपसा सिंचन योजनेलाही लवकरच आपल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मंजुरी मिळणार आहे. या तिन्ही योजनांची पंप स्थळे व क्षमतेचे तांत्रिक परीक्षण करण्यासाठी स्थायी समितीने प्रत्यक्ष पाहणी केली. 
ही सिंचन प्रकल्पे आदिवासी भागातील शेतीला पाणीपुरवठा करून शेती उत्पादन वाढवण्यासाठी प्रभावी ठरणार आहेत. या योजनांमुळे हजारो हेक्टर शेतजमिनी सिंचनाखाली येणार असून, या भागाचा शाश्वत विकास सुनिश्चित होणार आहे. पाणी हेच जीवन आणि पाणी हेच समृद्धीचे दार उघडणारे माध्यम आहे. या तिन्ही सिंचन योजनांमुळे आंबेगाव तालुक्याच्या सामाजिक, आर्थिक व सर्वांगीण विकास आणि प्रगतीला यामाध्यमातून मोठा आधार मिळणार आहे, यात शंका नाही.
यावेळी या समितीचे अध्यक्ष व जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता सं.द.चोपडे, सदस्य व नाशिक विभागाचे मुख्य अभियंता आशिष देवगडे, यांत्रिकी विभाग नाशिकचे मुख्य अभियंता श्री. घंटावार, कुकडी सिंचन मंडळ पुणेच्या अधीक्षक अभियंता श्रीमती अलका अहिरराव, डिंभे धरण विभाग मंचरचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता अभय वीर, उप अभियंता दिपक गोडे तसेच बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलप, शंकरराव बांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                    
                                        1