Dilip Walse Patil
June 21, 2025 at 09:15 AM
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२३-२४ अंतर्गत आयोजित संत तुकडोजी महाराज स्वछ ग्राम स्पर्धेत आपल्या मतदारसंघातील आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी ग्रामपंचायतीने पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल समस्त आदर्शगाव गावडेवाडी ग्रामस्थांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!!!
ग्राम स्वछता अभियानासारख्या अभिनव उपक्रमामध्ये आपल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावणे ही अत्यंत आनंददायी व अभिमानास्पद बातमी आहे. या यशामध्ये गावडेवाडी ग्रामस्थांनी दाखवलेली एकजूट, स्वच्छतेबाबतची सजगता, स्वयंप्रेरित सहभाग आणि ग्रामविकासासाठी केलेले अथक परिश्रम खरोखरच कौतुकास्पद आहेत.
हा सन्मान केवळ गावडेवाडी ग्रामपंचायतीसाठीच नव्हे, तर संपूर्ण आंबेगाव तालुक्यासाठी एक प्रेरणादायी आदर्श आहे. समस्त गावडेवाडी ग्रामस्थांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!
