मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र
June 12, 2025 at 02:05 PM
अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन
"ना जात, ना धर्म बस किसान हमारा धर्म !
"जब सिस्टम अंधा हो जाए, तब इंकलाब आँखें खोलता है।"
------------
राष्ट्र प्रथम
मा. बच्चू कडू यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण कशासाठी ?
- प्रमुख मागण्या -
१) दिव्यांग व विधवा महिलांना रु. ६०००/- मानधन देण्यात यावे.
२) आपल्या संकल्पानूसार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी देण्यात यावी तसेच शेतमालाला MSP (हमीभाव) वर २०% अनुदान देण्यात यावे.
३) दि. ०७ एप्रिल २०२५ रोजी आपल्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीच्या ईतिवृत्ताप्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावे.
४) युवकांच्या हाताला काम द्यावे नाहीतर सन्मानजनक दाम देण्यात यावे तसेच रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात व जास्त पदसंख्यांच्या जाहिराती प्रसिध्द करण्यात याव्या.
५) शहराप्रमाणे ग्रामिण भागातील घरकुलांकरीता समान निकष लावून किमान रु. ५ लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे.
६) शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजूरांचा अपघाती मृत्यु झाल्यास आर्थीक सहाय्य देण्यात यावे तसेच शेतमजूरांकरी स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावे.
७) पेरणी ते कापणी पर्यंत मजूरीची सर्व कामे MREGS मध्ये घेण्यात यावे तसेच फळपिकांना ३:५ रेषो लावून दुग्ध व्यवसायसुध्दा MREGS ला जोडण्यात यावा. हे जर होत नसेल तर तेलंगाणाच्या धर्तीवर एकरी १०,०००/- मदत किंवा भावाचा चढउतार निधी देण्यात यावा.
८) ज्याप्रमाणे रासायनिक खाताला अनुदान देण्यात येते त्याच प्रमाणे शेणखताला / सेंद्रीयखताला अनुदान देण्यात यावे.
९) मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे.
१०) निवासी अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावे.
११) मनरेगा मधील मजूरी रु. ३१२/- वरून रु. ५००/- करण्यात यावी.
१२) दुधातील भेसळ रोखण्यात यावी तसेच गायींच्या दुधासाठी बेस रेट रु. ५०/- प्रती लिटर व म्हशीच्या दुधासाठी बेस रेट रु. ६०/- प्रती लिटर मिळावा.
१३) कांद्याचे दर स्थिर राहावेत यासाठी किमान ४०/- रुपये बाजार भाव होई पर्यंत निर्यात बंदीचा निर्णय करू नये. निर्यात बंदीच्या निर्णयानंतर बाजार भाव कोसळताच त्यावपेळेस बाजारभाव सावरण्यासाठी नाफेड व एनसीसीएफ सारख्या संस्थांनी थेट शेतकऱ्यांचा कांदा बाजार समितीमधून खुल्या लिलावात खेरदी केला पाहीजे. किमान २५/- रुपये बाजार भाव राहावेत यायसाठी धोरण बनविण्यात यावे.
१४) सन २०२५-२६ या वर्षासाठी ऊस पिकाला प्रति टन ४३००/- रुपये दर १% रिकव्हरी बेस रेट घुरन मिळावा. तसचे पुढील ११% रिकव्हरीसाठी ४३०/- रुपये एफआरपी दर मिळावेत. तसचे प्रत्येक शेतकऱ्याला काटा करून रिकव्हरी काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी व १५ दिवसामध्ये पैसे दिले नाही तर व्याजासह पैसे वसूल करण्याचे अधिकार स्थानिक यंत्रणेला देण्यात यावे,
तारीख : ८ जून पासून सुरवात
ठिकाण : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महासमाधी जवळ, गुरुकुंज मोझरी, ता. तिवसा, जि. अमरावती
रुग्णाचा सेवक निराधारांचा आधार
अपना भिडू बच्चूभाऊ कडू
____________
जय हिंद... 🇮🇳
---------
जय जवान
जय किसान
---
#prakashchavan
#प्रकाश_चव्हाण
#शेतकरी_वाचवा_अभियान
#महाराष्ट्र
================
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬
👍
❤️
3