मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र
June 21, 2025 at 08:22 AM
समाज जपणारे, समाज न विकणारे मनोज जरांगे पाटील !! मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीत अनेक चर्चा झाल्या, अजूनही अनेक तर्क-वितर्क लावले जातात. काहींचं म्हणणं आहे की त्यांना डॅमेज केलं आहे. त्यांची क्रेझ कमी झाली आहे. त्यांच्या आंदोलनाचे चांगले वाईट परिणाम वगैरे-वगैरे …, खरं तर या गोष्टी काळ ठरवेल. असं ही तो माणूस सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला नाही. एका फाटक्या माणसाने राज्य हादरून टाकलं हीच फार मोठी गोष्ट आहे. क्रेझ कमी किंवा जास्त ही होऊ शकते. त्यांच्या काही मुद्द्यांशी मी सहमत ही नाही. तुम्ही ही असाल-नसाल. पण त्यांच्या एका गोष्टीला दादच द्यायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी समाज विकला नाही. त्यांनी मागितली असती तर कोणतीही खासदार की, आमदार की…, चार-दोन मंत्रीपद, काहीशे कोटी रुपये कोणीही त्यांच्या दावणीला आणून टाकले असते. पण स्वतःचा स्वार्थ पाहून त्यांनी समाज विकला नाही. समाज पुढे करून कोणाला काही मागितले ही नाही. गडी भिडला, नडला, रडला, पडला पण लढला…, शिवाय समाजाच्या कोणत्याही आंदोलनाकडे, समस्येकडे कधी पाठ फिरवली नाही. समाज वाऱ्यावर सोडून दिला नाही. दसरा मेळावा असो की छोट्या-मोठ्या मिटींगा…! व्यसन करू नका, लग्न छोटे करा, बांधावरून भांडू नका, चांगलं शिक्षण घ्या असे संदेश ही त्यांनी दिले. त्यांचा द्वेष करा किंवा समर्थन पण या गोष्टी आहेत त्या मान्यच कराव्या लागतील. - चांगदेव गिते
❤️ 👍 🙏 10

Comments