
Adv. Prakash Ambedkar Official
June 21, 2025 at 05:44 AM
मुख्यमंत्री
@Dev_Fadnavis
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला महाराष्ट्राचे ओबीसी नेतृत्व, माजी खासदार आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे या मागणीला आगरी, कोळी समूहासोबत वंचित बहुजन आघाडीने समर्थन दिले होते.
नुकतंच या संदर्भातील आगरी, कोळी समूहाच्या शिष्टमंडळाने आपली भेट घेऊन ही मागणी पुन्हा केली आहे. या मागणीबद्दल केंद्रीय स्तरावर लवकरात लवकर निर्णय व्हावा, अशी आमची मागणी आहे. मागच्या सरकारने या संदर्भातल्या मागणीकडे दुर्लक्ष केले, किमान आपण तसे करणार नाहीत अशी अपेक्षा आहे.
रायगड जिल्ह्यातील उलवे, कोपर, पनवेल या पट्ट्यातील मूळ रहिवासी व भूमिपुत्र असलेल्या आगरी, कोळी बांधवांनी आपल्या जमिनी दिल्या होत्या. नवी मुंबईच्या इतिहासात दि. बा. पाटील यांचे बहुमोल असे योगदान राहिले आहे, या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी दि.बांनी लढा दिला आणि नेतृत्व केले होते. ओबीसींच्या जागृती व हक्कांसाठी संघटित झालेल्या ओबीसी चळवळीचे ते लढाऊ नेते होते.
पुन्हा एकदा नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे. जर सरकारने ही मागणी पूर्ण केली नाही, तर आगरी, कोळी बांधवांसह वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर येईल.
👍
❤️
🙏
✊
💙
❤
69