
Rajkumar Badole ✅
May 24, 2025 at 10:17 AM
यूके ची ब्रिटिश लायब्ररी ही जगातील सर्वांत मोठ्या लायब्ररीपैकी एक आहे आणि तिथे जवळपास १७ कोटी पुस्तके व इतर साहित्य उपलब्ध आहेत. ज्यात हस्तलिखिते, पांडुलिपी, स्टँप्स, पेंटिंग्स, साइंटिफिक जर्नल्स आणि वेगवेगळ्या कला आणि साहित्य क्षेत्रातील ३००० वर्षापासून वस्तू उपलब्ध आहेत. ज्यात वेद, त्रिपिटक, बायबल ची मूळ प्रति अशा खूप जुन्या मौल्यवान कलाकृती आहेत. त्याचसोबत शेक्सपीयर, लिओनार्दो द विंची, गुटेनबर्ग, महात्मा गांधीं अशा अनेक थोर व्यक्तींचे मूळ डायरी व इतर पुस्तके आहेत. दुसरीकडे भारतात ५ व्या शतकात समृद्ध असलेले प्राचीन ज्ञानकेंद्र म्हणजे नालंदा विद्यापीठ हे भारतातील एकमेव विद्यापीठ, जिथे १०,००० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असत आणि २००० शिक्षक विद्यादान करीत होते. तिथे ९००० ते १ कोटी पर्यंत हस्तलिखिते आणि पांडुलिपी होते. तीन पुस्तकालय होते. रत्नसागर, रत्नरंजन आणि रत्नादधी जे अनेक मंजिल उंच होते. चीनी यात्री युवानस्वोंग आणि इत्सिंग यांचे अनुसार हे पुस्तक संग्रहालय इतके विशाल होते की इथे वाचायला अनेक वर्षे लागतील. म्हणतात कि, जेव्हा बख्तियार खिलजी यांनी नालंदा वर आक्रमण केले आणि पुस्तकालयाला आग लावली ते अनेक महिने जळत होत्या. विद्वान म्हणतात नालंदा येथे ९००० ते १ कोटी पुस्तके होत्या.
ब्रिटिश लायब्ररी किंवा नालंदा विद्यापीठ एक आधुनिक ज्ञानकेंद्र. एक प्राचीन ज्ञानकेंद्र. एक आधुनिक एक प्राचीन. एक आधुनिक समृद्ध एक प्राचीन बौद्धिक संपत्ती.
-
राजकुमार बडोले

🙏
1