
Rajkumar Badole ✅
May 26, 2025 at 03:13 AM
ऐतिहासिक घोडदौड करत आपला भारत देश आता चौथ्या क्रमांकाची जागतिक अर्थशक्ती बनला आहे. याचनिमित्त आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारच्या ‘मुख्यमंत्री परिषदे’त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व मा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले आहे. तसेच,विकसित भारत २०४७ चे लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण क्षमतेने सज्ज असल्याची ग्वाही देखील यावेळी मा. अजितदादांनी दिली.