
Rajkumar Badole ✅
June 9, 2025 at 02:57 PM
आज मच्छिमार समाजाच्या विशेष बैठकीचे आयोजन कटंगी टोला येथे करण्यात आले होते, निमित्ताने उपस्थित राहून मच्छिमार बांधवांशी संवाद साधला आणि विविध विषयांवर चर्चा केली. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात मच्छिमार बांधवांच्या समस्या मांडल्या आणि त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती दिली. सोबतच मासेमारी ला आता शेतीचा दर्जा मिळाला असल्याचे परिपत्रक निघाले असून यामुळे शेतीसाठी मिळणारे लाभ आता मासेमारी करणाऱ्यांना सुद्धा मिळणार असल्याचे सांगितले. यामुळे शेत कर्ज, किसान क्रेडिट कार्ड, मोफत वीज सारख्या सुविधांचा लाभ मासेमारी करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. दरम्यान मासेमारी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. गरज पडल्यास मंत्रीमहोदयांशी चर्चा करण्याचे आश्वासन सुद्धा दिले. गोंदिया - बल्लारशाह रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होणार आहे त्यामुळे जादा गाड्या या मार्गावर धावतील यामुळे मच्छिमारांसाठी आपला माल ने - आण करण्याकरिता आणखी पर्याय उपलब्ध होणार आहे. दरम्यान या बैठकीला सामाजिक कार्यकर्ते, महिला व युवक देखील उपस्थित होते. त्यांना शासकीय योजनांचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन केले.
माझे इंस्टाग्राम👇🏻
https://www.instagram.com/rajkumarsbadole
-
राजकुमार बडोले
माजी मंत्री सा. न्याय व विशेष सहाय्य
आमदार, अर्जुनी मोरगाव विधानसभा