Bacchu Kadu
June 14, 2025 at 06:29 AM
गुरुकुंज मोझरी येथे मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या कर्मभूमीत आदरणीय बच्चुभाऊनी गेल्या ०८ तारखेपासून शेतकरी बांधवांच्या संपूर्ण कर्जमाफी साठी व दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे...
गुलामी मे था वतन हमारा!
तभी से रोता किसान सारा !
अभी तो हालत बडी बुरी है !
कभी इधर भी चला करोगे !!
ऐ दीन बंधू सुनो हमारी !
किसान का कब भला करोगे !!
हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यावेळी लिहीलेले शब्द आजच्या परिस्थितीतीला अगदी जुळून येतात. आज शेतकऱ्यांची आणि शेतीची अवस्था ही अत्यंत दयनीय झाली आहे.
दररोज वाढणाऱ्या कर्जापायी शेतकरी हा हतबल होत आहे तर निसर्गाचा अनियमितपणामुळे व सतत होणाऱ्या नापीकीमुळे राज्यातील असंख्य शेतकरी बांधव आपली जीवनयात्रा संपवत आहेत.
त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात हे चित्र फार विचित्र वाटत आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असला तरीही त्यांच्या शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार मात्र त्याला नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणून
तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो..!
सकळांचे लक्ष तुझकडे वळो..!!
या न्यायाने शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, कामगार, विधवा व परित्यक्ता भगिनी आणि दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांकडे शासनाने लक्ष द्यावं, सामान्य माणसांचे प्रश्न समजून घ्यावेत आणि शेतकरी बांधवांच संपूर्ण कर्ज माफ करावं यासाठी हे जन आंदोलन असावं असं मला वाटतं.
आदरणीय बच्चुभाऊची आंदोलनाची एक वेगळी ओळख आहे आजपर्यंत त्यांनी शेतकरी व दिव्यांगांच्या हितासाठी असंख्य आंदोलनं केलीत त्यामध्ये सन २००६ मधील दिवाळीच्या दिवसांमध्ये आदरणीय बच्चुभाऊ व आदरणीय नयनाताई या दोघांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पहीलं अन्नत्याग आंदोलन ते याच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पवित्र भूमीत केलं होतं त्या आंदोलनाचा मला साक्षीदार होता आलं यांचा मला सार्थ अभिमान आहे आज त्यावेळी झालेल्या आंदोलनाची आठवण आल्याशिवाय राहावत नाही..
त्यावेळी मी आश्रमात ९ वी ला शिकत होतो.घरची परिस्थिती हलाखीची असल्याने कित्येक दिवाळ्या आश्रमातच साजऱ्या झाल्यात त्यामुळे माझाही मुक्काम हा आश्रमातच असल्याने आदरणीय बच्चुभाऊ आणि नयनाताई यांच्या व्यवस्थेची जबाबदारी ही आदरणीय बोथे गुरुजींनी माझ्यावर सोपविली होती. त्यामुळे आंदोलन काळात मला त्यांच्या सेवेत राहता आलं, त्यांनी उभारलेलं काम जवळुन पाहता आलं आज त्याचा मनापासून आनंद आहे.
आदरणिय बच्चूभाऊ तेव्हा पहिल्यांदा आमदार झाले होते आणि नयनाताईंची सुद्धा या आंदोलनाची ही पहीली सुरुवात होती. व्यक्तिगत आयुष्यातील सुख बाजूला ठेवून समाजाच्या सेवेतच दोघंही आपला आनंद शोधत होते. आपला नवरा आमदार आहे याचा कुठलाचं बडेजाव नाही, कुठल्याही मोठ्या अपेक्षा नाही, कुठल्याही मानपानाची भानगड नाही अगदी साध्यापनानं हे दोघंही सदैव कार्यकर्त्यांच्याच गोतावळ्यात राहत होते.
कुठलाही गाॅडफादर पाठीशी नसतांना एखाद्या नविन नेत्याला कितीतरी भुमिकेतून जावं लागतं याची आज जाणीव होते. आणि बच्चूभाऊ हे त्या सर्व भुमिका पार करत नेते झालेले आहेत म्हणुनच त्यांच व्यक्तिमत्त्व हे अगदी मनाला भावतं..
आज राजकारणाची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे चांगले चांगले नेते सुद्धा गढुळ झालेल्या राजकीय प्रवाहात वाहून गेले आहेत हे आपल्याला माहीतच आहे. पण बच्चुभाऊंनी शेतकरी आणि दिव्यांग यांचा कधी विसर पडु दिला नाही सत्तेत असताना ही ते व्यवस्थेच्या विरोधात लढत होते ही त्यांची विधानसभेच्या सभागृहातील ओळख होती.
परंतु आज बच्चूभाऊनी उभारलेले अन्नत्याग आंदोलन हे सर्वांसाठी महत्वाचे झाले आहे कारण आजचा काळ हा जाती धर्मापेक्षा शेतकरी बांधवांना साथ देण्याचा आहे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा आहे. त्यामुळे या आंदोलनातून हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय नक्कीच घेईल या आशेसह आदरणीय बच्चुभाऊंचे आरोग्य चांगलं रहावं ऐवढीचं श्रीगुरुदेव चरणी प्रार्थना....
आपला
श्रीकृष्ण
🙏
👍
🎉
😢
23