Bacchu Kadu
June 15, 2025 at 09:04 AM
*आंदोलन गुरु*
गुहावटीच्या गर्दीत हरवलेले बच्चुभाऊ सर्वसामान्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मोझरीत सापडले
अक्सर लोग टुटकर बिखर जाते है लेकीन जो टुटकर निखरता है उसका नाम बच्चुभाऊ है
चार वेळा अचलपूर मतदार संघाचे आमदार राहीलेले बच्चुभाऊ यावेळी हरले आणि जे वार्डातून निवडूण येवू शकत नाही त्यांनी म्हणायला सुरुवात केली--बच्चुभाऊ चे राजकारण संपले
विजयाने आत्मविश्वास वाढतो आणि पराभवाने अहंकाराची झालर गळून पडते या वाक्यावर विश्वास असणारे बच्चुभाऊ थांबणार नव्हतेच
शेतकरी शेतमजुर दिव्यांग कर्मचारी सर्वांचे प्रश्न घेवून आठ तारखेपासून बच्चुभाऊ उपोषणाला बसले. राकेश टिकेत दुसऱ्या राज्यातला किसान नेता व राज्यातील अनेक संघटना विवीध पक्षाचे आमदार खासदार एक एक करत पाठींबा देण्यासाठी येत होते. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांना ब्राम्हणांनी राज्यभिषेक नाकारला तरी महाराजांनी स्वतःचा राज्यभिषेक करून आपण महाराज असल्याचं सिद्ध केलं त्याचप्रमाणे बच्चूभाऊनी या आंदोलनातून आपल नेतृत्व अख्या महाराष्ट्राला दाखवून दिलं.
हे सर्व करत असतांना बीनीचे कार्यकर्ते जीव पणाला लावून लढत होते. कोणी विष प्राशन केलं कोणी चक्काजाम इतकचं काय या आंदोलनाची झळ पुण्यात अजीत पवार कार्यक्रमाला असतांना त्यांनाही सोसावी लागली
संजय राठोड सरकारच्या वतीने आंदोलन स्थळी आले असता त्यांच्या विरोधात काही शेतकऱ्यांनी घोषणा दिल्या त्यावेळी नयनाताई यांनी त्यांना शिस्त लावली
असं हे मस्तीत आणि शिस्तीत आंदोलन सुरू होतं
बावनकुळे आले चर्चा झाली शासनाचे लिखीत पत्र भेटल्यानंतर उपोषण सुटले
जो शेतकरी झाडाला पाणी देण्यासाठी शेतात दांड फाडू शकतो
तो आपल्या मागण्यासाठी सरकारची----- फाडू शकतो
हे या निमित्ताने दिसून आले
परंतू या आंदोलनाकडे पाहतांना सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे संपूर्ण देशात जातीच्या आणि धर्माच्या नावावर राजकारणाला उत आलेला असतांना आणि धर्माच्या नावावर राजकारण करणारं सरकार सत्तेत असतांना बच्चुभाऊ मुद्याचं भांडवल करत रक्त ओकेपर्यंत लढले
संपूर्ण महाराष्ट्रात एक आशादायी चित्र निर्माण झालं की या पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा होणार नाही
बच्चुभाऊ तुम्हाला मानाचा मुजरा
🙏🙏🙏🙏🙏
🙏
👍
❤️
❤
🎉
👎
🫡
🏏
😂
🙇♀
159