
Yuti's Hub Library
June 6, 2025 at 06:01 AM
कथा
🌵स्पर्श तुझा काटेरी 🌵
भाग ५९
सीमा ची मुलगीही आता तीन वर्षाची झाली होती. राजसाची मुले पाच वर्षाची झाली होती. पण शावी राजवीरला अजूनही मुलं नव्हते.त्यांच्या लग्नाला सहा वर्ष झाली होती. राजवीरची आई आता शावीशी तुटक तुटकं वागायला लागली होती. सारखं टोमणे मारत होती.स्वतःला मुल नको आणि भावाचं बर खेळवावं वाटतं. शावीला खुप दु:ख होत असे.पण ती काही बोलत नसे.तिला वाटे त्यांना सगळं माहित असूनही अस का बोलतात.एके दिवशी शावीच्या घरी तिची मावस सासू आली.ती तिच्या सासूचे कान भरू लागली.
" अग शारदा तुझ्या नवऱ्याने आणि मुलाने एवढी संपती कमवून ठेवली आहे. पण काय कामाची .त्याला वारसचं नाही तर.मला वाटतयं दानच करावी लागेल बघं. त्यापेक्षा अस कर ना,माझा धाकटा मुलगा दमन याच्या नावावर कर.नाहीतरी या हडळीने माझ्या दुष्यंतला खाल्लचं आहे.त्याचा मोबदला समज.हाताशी कमवता आलेला मुलगा घेतला हिने.तेही नसेल पटतं तर राजवीरचे दुसरे लग्न कर.का होत नाही ग.हिला मुलं काय निघाला रिपोर्ट्स मधे."
" काय निघणार, अवघड आहे म्हणतात मुल होण.अगोदरच कांदा नासल्यावर त्याला पात कशी येणार.लग्ना अगोदरच कांड करून ठेवले होते बयेने.राजवीरचं मुलं नसत ना तर त्याच्या थाऱ्याला उभ केलं नसतं. "
" काय सांगतेस,लग्ना अगोदरच गरोदर होती ही.मग मुलं पाडलं कि काय हिने.म्हणूनच देव आता मुल देत नाही. बाई ग,कसला जमाना आलाय ग.राजवीर पण एवढा उतावळा कशाला झाला होता ग."
चहा घेऊन येणारी शावी बाहेरच थांबून सगळं ऐकत होती. ते ऐकून ती थरथरू लागली.तिच्या हातातून ट्रे निसटला आणि खाली पडला.कप खळकन फुटले.काय आवाज आला म्हणून सासू व मावशी बाहेर आल्या तर शावी रडत होती आणि धक्का लागल्या सारखी बघत होती.दोघीही घाबरल्या पण तसे न दाखवता ," काय झालं शावी बाळ."
शावीला हलवून तिच्या सासू बाई विचारू लागल्या. पण शावीने त्यांना झिडकारलं आणि पळतच आपल्या खोलीत निघून गेली. शावीची सासू व मावशी हादरून गेल्या. त्यांना कळालं कि शावीने सगळं ऐकलं आणि ती राजवीरला सांगणार.त्या घाबरून तिच्या मागे मागे गेल्या. त्या बाहेरून ओरडू लागल्या शावी दरवाजा उघडं आम्हाला तसं नव्हतं म्हणायचं.राजवीरचे बाबापण गडबडीने वर आले.पण आतून काही आवाज येत नव्हता. ते घाबरले."हरी,नामदेव,गणेश जरा वर या पटकन. "
सगळे नोकर वर गेले.त्यांना बाबांनी दरवाजा तोडायला लावला. दरवाजा तुटला आणि पाहतात तर काय.शावीने पंख्याला गळफास घेतला होता आणि सारंगी पलंगा जवळ थांबून रडत होती. बाबा ,राजवीरची आई ,मावशी सगळे एकदमचं ओरडले.तेवढ्यात मागून आशाने ( त्यांची कामवाली) पाहिले.तिने लगेच राजवीरला फोन लावला.
" साहेब शावी मैडम ने पंख्याला गळफास घेतला. " तसेच तिने राजसालाही कळवले .राजवीर तर मिटींगरूममधे मिटींगमधे होता.तो खूप जोरात ओरडला."काय्य,काय बोलतेस तू."तो धावतच पळतच निघाला. कोणाला काय झालं आहे हे कोणालाही कळाले नाही. इकडे राजसाने तिच्या सासरी सगळ्यांना सांगितल. सगळे ते ऐकून हबकलेच.आई मात्र शांत होती.राजसा तर रडायलाच लागली.तिचे बघून सीमापण रडायला लागली. तिने जय,विजय व बाबांना कळवले. ते ही घाबरून निघाले.
इकडे राजवीरचे बाबा पळतचं आत गेले.ते पटकन पंलगावर चढले आणि शावीचे पाय धरून वर केले.जेणे करून गळ्यावर ताण येऊ नये.नोकरांना पटकन तिला खाली उतरावयाला सांगितले.लगेच गाडीत घालून सिटी हॉस्पीटल ला घेऊन निघाले.आशाला सगळ्यांना तिकडेच यायला सांग असे सांगितले. राजवीरची आई व मावशी दुसऱ्या गाडीतून मागे मागे निघाल्या.पण काय होईल शावीचं ती वाचेल कि राजवीरने दुसरं लग्न करावं म्हणून या जगातून निघून जाईल.
क्रमशः
सौ हेमा येणेगुरे पुणे
👍
❤️
😢
9