Yuti's Hub Library
Yuti's Hub Library
June 7, 2025 at 12:27 AM
कथा 🌵 स्पर्श तुझा काटेरी 🌵 भाग ६०( अंतिम) राजवीर व सगळे दवाखान्यात पोहचले. "डाक्टर माझी बायको कोठे आहे शावी नाव तिचे." " ,शांत व्हा मिस्टर राजवीर ती आत आहे .चेकप चालू आहे. " " या शहरातील‌ सगळे नामवंत डाक्टर मला इथे हवे आहेत.कितीही पैसा लागू द्या. पण तिला वाचवा." " हे बघां राजवीर सगळे मोठमोठे डाक्टरर्स तपासत आहेत.आधी ती कशी आहे. हे तर तपासू द्या. " " बाबा तिने असे का केले? काय झालं अस तेंव्हा. ज्यामुळे तिने हे शेवटचे टोकाचे पाऊल उचलले." " माहित नाही राज,मी तर बाहेर बागेत होतो.आई व मावशी आत होत्या. " बाबांच व राजवीरचं बोलण ऐकून त्या दोघी हादरल्या.त्यांना राजवीरचा राग माहित होता.त्या शांत होत्या. राजवीर त्यांच्याकडे येतोय पाहून त्या समोर असलेल्या गणपतीला प्रार्थना करू लागल्या. "आई काय घडलं घरी" " काय माहित रे,मी व मावशी माझ्या रुममधे बोलत बसलो होतो. आशाचा आवाज ऐकून बाहेर पळालो." आई घाबरून खोटे बोलली.तो अजून काही बोलणार इतक्यात आतले डाक्टर्स बाहेर आले. "डाक्टर माझी बायको कशी आहे." " ती आता ठिक आहे. तुझ्या बाबांनी वेळेवर आणले म्हणून वाचली.नाहीतर दोन जीव गेले असते.तशी ही पोलिस केस आहे." " मी सर्व मॅनेज केले आहे. पण दोन जीव काय म्हणत आहात." " म्हणजे तुम्हाला माहित नाही. शी इज प्रेगनेंट. दिड महिना झाला आहे. " " काय्य"" " एस" " डाक्टर ती आता कशी आहे. " " ती ठिक आहे. एक तर तिला कसला तरी मानसिक धक्का बसला आहे. दुसरे गळ्यावर ताण आल्याने बेशुद्ध आहे.लवकरच शुध्द येईल." " ओके डाक्टर " डाक्टर बाहेर आल्यावर राजवीर आत गेला. त्याने शावीचा हात पकडला. " ये वेडा बाई काय केलस तु हे.आणि का? आपल्या बाळाचा तरी विचार करायचा होतास." तेवढ्यात त्यांच्या मोबाईल वर मेसेजेस आले.महत्वाच्या मिटींग मधून उठून आला होता.ते बघण्यासाठी त्याने मेसेजंर उघडला आणि समोर शावीचा मेसेज दिसला.इकडे आई आणि मावशी थोड्या खुश झाल्या कि शावी जिवंत आहे. पण तिने खरं काय ते राजवीरला सांगू नये.त्या भितीमुळे आपल्याला नातवंड होणार आहे. याचा आनंदही होत नव्हता.त्या पार हादरून गेल्या होत्या. राजवीरने तो मेसेज वाचला. " मम्मी आणि मावशींना आपल्या घरचा वारस हवाय.त्यासाठी तुम्ही दुसर लग्न करावं ही त्यांची इच्छा आहे. माझीही तिच इच्छा आहे. त्यामुळे आणि तसही मी नासका कांदा आहे.त्याला परत पात येणार नाही म्हणजेच मुल होणार नाही. लग्ना अगोदरच मी कांड केलेली मुलगी आहे. तेंव्हा मला जिवंत राहण्याचा हक्क नाही.मी या जगातून जात आहे. तुम्ही दुसरे लग्न नक्की करा.माझी शपथ आहे तुम्हाला. " हे वाचताच राजवीर रागाने थरथरू लागला.तो खोलीबाहेर आला.ताडताड आईकडे गेला.सगळे त्याच्या मागे गेले. " काय केलसं आई,तु अस का बोललीस शावीला.तुला आई म्हणायला लाज वाटते." " काय झालं राजवीर." " हे वाचा बाबा" ते वाचून बाबांना ही राग आला. त्यांनी राजवीरच्या आईच्या कानाखाली लगावली. सगळे अवाक होऊन पाहू लागले. " तुम्हाला लाज वाटली नाही असे बोलायला." तो पर्यंत सगळ्यांनी तो मेसेज वाचला.सगळे तुच्छतेने राजवीरची आई व मावशीकडे पाहू लागले. " मी नंतर तुमच्या कडे पाहतो.बाबा शावी ठिक झाली कि मी व शावी वेगळे राहणार." " ,नको राजवीर,मी काय गुन्हा केला आहे.मला का शिक्षा देत आहेस." " ठिक आहे बाबा आम्ही वेगळे राहणार नाही.पण शावी मुलं होई पर्यंत तिच्या माहेरी राहिलं तेही कोणाला अडचण नसेल तर? नाहीतर मी तिची वेगळी सोय करेन.पण आई जवळ तिला ठेवणार नाही.हिचा काही भरवसा नाही." " नाही राजवीर शावी आमच्या कडेच राहिलं. जय,विजय,सीमा व राजसा काळजी घेतील तिची.किय रे पोरांनो बरोबर बोलतोय ना." शावीचे बाबा म्हणाले.. सीमाच्या डोहाळजेवणापासून तेही शावीच्या आईला निटसे बोलत नव्हते.सीमा,विजय,जय राजसा सगळ्यांनी हो बाबा म्हणून होकार दिला.शावी शुध्दीत आल्या वर सगळे भेटले.सासू व मावशी भेटायला गेल्या तर तिने मान फिरवली.शावीला सगळ्या कडून गोड बातमी कळाली होती.सगळ्यांनी तिला दटावले ही होते कि तिने परत असे कधी करायचे नाही. शावीला नंतर माहेरी नेण्यात आले. चोरचोळी ,सातव्या महिन्याची चोळी केली.राजवीरची इच्छा नसताना शावी म्हटली म्हणून आईला या कार्यक्रमात बोलवलं गेलं. आईला खुप वाईट वाटतं होतं. आपण बहिणीच्या बहकाव्यात येऊन शावीला नाही नाही ते बोललो.राजवीर आणि राजसा साठी तिने किती आणि काय काय केलं.आपण सर्व विसरलो.त्यांनी शावीचे पाय धरून माफी मागीतली.पण शावीने त्यांना थांबवले. कितीही झाले तरीही त्या राजवीरच्या आई व तिच्या सासूबाई होत्या. दोन महिन्यानी शावीने गोड मुलाला जन्म दिला. राजवीरने आईला बाळ पाहू दिले नाही.पण बाळ चार महिन्याचे झाल्यावर बाळाचे बारसे राजवीरच्या घरी आजी आजोबा समोर करायचे असे शावीने सांगितले. राजवीरने विरोध केला. पण शावीने समजावले. " हे बघं राजवीर ,त्या मला काहीही बोलल्या तरीही त्या तुझ्या आई आहेत.त्या तुझ्याच काळजी पोटी बोलल्या आहेत.कोणत्याही आईला वाटते .आपल्या घराला वारस मिळावा.पण त्यांची बोलायची पद्धत चुकीची होती.त्यांना पश्चातापही होतोय.मुलांना आजी आजोबा पासून आणि आजी आजोबांना नातवंडांन पासून दुर ठेवू शकत नाही. तु आता त्यांना माफ कर. बाबा बघं डोळ्यात प्राण आणून नातवंडाची वाट पाहत आहेत. " शेवटी राजवीर तयार झाला. मुलाचे बारसे राजवीरच्या घरी झाले.मुलाचे नाव शाभंवीर ठेवण्यात आले. पण सगळे त्याला शंभूच म्हणत असत.सारंगी इतके दिवस राजसा व जय बरोबर राहूनही तेथे रहायला तयार नव्हती. ती शावी बरोबर निघून गेली. तिला आता माहित झाले होते कि राजसा व जय तिचे खरे आई वडील आहेत. पण तिला शावीचा लळा लागला होता. जय नाराज होता पण मुलीच्या हट्टापायी शांत बसला.पण आता तिला रोज भेटूनच आफीसला जात असे. मामा मामी पण अधूनमधून मुबंईला येऊन राहत असत तर कधी जय राजसा तिकडे जात असत. आता शावीचा संसार सुखाचा सुरू झाला. राजवीर आणि त्याच्या आईत संभाषण सुरू झाले होते. विजय मात्र आपण दुसरे मुल करू म्हणून सीमाच्या मागे लागला होता. सीमा एवढ्यात नको म्हणत होती. सगळं आता अलबेल झाल होतं.शावीला काटेरी वाटणारा स्पर्श आता प्रेमळ वाटू लागला होता. समाप्त. सौ हेमा येणेगूरे पुणे. कथा कशी वाटली .अभिप्राय द्या. शेवट योग्य आहे का सांगा. 8454041410
👍 ❤️ 🙏 33

Comments