Yuti's Hub Library
Yuti's Hub Library
June 12, 2025 at 06:36 AM
*"टूडेज सावित्री"* ती वडाच्या फांदीखाली बसलेली नाही, ती आय.टी.च्या स्क्रीनपलीकडे दिसते, ती पिंपळपानं ओवून नवऱ्याचं आयुष्य मागत नाही, ती त्याच्यासोबत उभी राहून त्याचं आयुष्य बनवते. तिला यम भेटत नाही, पण बँकेचे कर्ज, मुलांचं शिक्षण, आणि सासूचा रिपोर्ट या सगळ्या यमाच्या रूपांशी तिचा रोज तिचा सामना होतो हसत, लढत, झगडत. ती नवऱ्याच्या पाठी मागे उभी नाही, ती त्याच्या शेजारी आहे त्याच्या थकलेल्या खांद्यावर हात ठेवणारी, त्याच्या अपयशात सुद्धा माझा आहे ना! म्हणणारी. ती संध्याकाळी फक्त दिवा लावत नाही, ती घर, नोकरी, स्वप्नं आणि नातं....... सगळं उजळवत ठेवते. ती पाटावर ओवाळत नाही, पण सकाळी दोन डब्बे भरते — एक स्वतःसाठी, एक त्याच्यासाठी. ती उपवास करत नाही, पण गरज पडली, तर स्वतःच्या भुकेवर पाणी फिरवते. आजची सावित्री काळावर नाही, परिस्थितीवर मात करते, ती पूजा नाही करत, पण रोजच्या जगण्याला एक तपस्येचं रूप देते. हीच खरी सावित्री — मूक नाही, कधी कधी थकलेली, पण कधीही हार न मानणारी. तिला वंदन, तिच्या अस्तित्वाला सलाम!
👍 🙏 ❤️ 15

Comments