
Yuti's Hub Library
June 12, 2025 at 01:24 PM
निशा ने गोळी घेतली आणी ती झोपायला गेली.. छातीत थोडं दुखत होतं.. आधीच acidity आणी त्यात उपास.. करायलाच नको होता उपास.. तिच्या मनात आलं..
थोड्या वेळाने झोप लागली तिला..थोडा वेळ गेल्यावर झोप उघडली तर कोणाच्या तरी हसण्याचा आवाज येत होता जोरजोरात..ती चटकन उठुन बसली.. बघते तर समोर एक विचित्र माणुस.. शिंग असलेला.. अक्राळविक्राळ..तिने लगेच ओळखलं काय झालं असेल..
तो माणुस म्हणाला.. मी यमराज आहे.. चल मी तुला घेउन जायला आलो आहे..
निशा: अहो पण असं कसं जिवंतपणी नेणार?
यम: तुझा मृत्यु झालेला आहे बालिके.. आता तुला माझ्यासोबत यावंच लागेल..तुला तुझ्या पापांची कबुली द्यायची असेल तर आत्ताच दे
निशा: आम्हां मध्यमवर्गिय लोकांची पापं ती कसली.. चुका म्हणा हवं तर
यम: तरीपण काही केलं असशील तर.. म्हणजे प्रेमप्रकरण वैगरे..
निशा: हो.. ते एक आहे.. खरतर दोन आहेत.. एक लग्नाआधीचं आणि एक लग्नानंतरचं .. दोन्ही पुरुष नवरयापेक्षा एवढे उजवे होते म्हणून सांगू ..
यम: अगं बाई, तुला लाज वाटत नाही का?
निशा:अहो यम दादा हळू बोला जरा.. माझा नवरा झोपला आहे.. त्याला माहित नाहिये काही..तसं त्याला अजुन बरंच काही माहित नाहिये म्हणा..
यम: अजुन काय लपवलस तू त्याच्यापासून??
निशा: नविन 3 4 ड्रेस मागवलेत मी.. आत ठेउन दिले होते कपाटात गुपचुप.. घेऊन येऊ का सोबत?
यम: अगं बाई, तू मृत्यु पावली आहेस.. ड्रेस वैगरे मोह माया आहे त्यात अडकू नकोस.. अजुन सांग काय सांगितल नाहिस नवरयाला ??
निशा:काय बरं..हा..आठवलं परवा त्यांच्या मैत्रिणीचा फोन आला होता.. हे आत होते washroom मधे.. कार बंद पडली होती तिची.. मी दिलं सांगून.. आमचीच कार बंद पडल्ये बाई.. ते नाही येऊ शकत तुझ्या मदतीला..
यम: काय?? अगं असं का केलस तू?
निशा: हो मग ..त्या महामायेला अडचण आली की ह्यांची आठवण येते.. आणी हे पण निघाले लगेच तिचा कॉल आला की..
यम:फार वेळ झाला..चल आता.. आधी शेवटची काही इच्छा असेल तर सांगून टाक..
निशा: मला तर बाई आता पुढच्या जन्मी शाहरूख खान ची बायको व्हायचं आहे.. मस्त romantic.. DDLJ मधे मी किती वेळा काजोलच्या जागी स्वताला पाहिलं आहे.. त्याच्या सोबत मऊ मऊ दुलईत....
असं निशा ने म्हणताच यमाने डोक्यावरचा शिंगांचा मुकुट फेकून दिला.. आणी म्हणाला.. लाज नाही वाटत तुला, नवरयासमोर असं बोलताना..
निशा हसली आणी म्हणाली.. " तुम्हाला लाज नाही वाटत, अशी सोंग काढून येताना? मी तर केव्हाच ओळखलं होतं.. प्लास्टिक सर्जरी करुन आलात ना तरी ओळखेन मी..कसं काय केलत म्हणायचं असं सोंग?
नवरा म्हणाला " अगं ते आज ऑफ़िस ला cultural fest होती ना.. आयत्या वेळी यम आजारी पडला.. मग काय मीच झालो यम.. पण ते सोड.. कोणती प्रेमप्रकरण गं तुझी? ते सांग आधी..
निशा हसत म्हणाली " प्रकरण नाही पण प्रेम नक्की आहे दोन पुरुषांवर.. लग्नाआधी बाबांवर.. आणी लग्नानंतर आपल्या मुलावर 😜😜
सायली
😂
👍
❤️
🙏
30