
Yuti's Hub Library
June 16, 2025 at 08:51 AM
कथा
"त्रिकाल सत्य - एक गुपीत
भाग २
कधी कधी मागची कोडी सोडवता सोडवता,पुढील प्रश्न निर्माण होतात.त्यात अकालनीय कोडी सोडवताना थरारक अनुभव घ्यावा लागतो.आज तसचं काहीतरी घडणार होतं.क्षितीजावर काळी वाट जमिनीवर पसरलेली होती.त्यातून बचक बचक आवाज करत ती काळी आकृती परचूरेच्या वाड्या कडे येत होती.रात्रीचे बारा वाजले होते. कोणत्याही वेळेला शुभदा बाळाला जन्मास घालणार होती.त्याच्याच प्रतिक्षेत सगळे होते.सुभाष आपला शिष्य जन्माला येणार या खुशीत होता.पण त्यालाही माहित नव्हते कि जे येणार आहे ते भयकंर आहे. मांत्रिकाने त्याला अर्धवट माहिती दिली होती. जे येत होतं ते लालभडक रंगाचे होते.जणू रक्ताने माखलेले असावे.सहा पायाचं चार डोळ्याचं चार हाताच व दोन पायावर चालणार एक अमानवी पशू .पशूच,त्याला काय म्हणावे कळतं नव्हतं. ते अभद्र झाडावर ओरखडा मारत येत होतं. त्यामुळे ते झाडं लगेच सुकून जाऊन जळत होतं आणि काळनिळं पडत होतं .त्या अभद्राच्या तोंडातून असंख्य जिभा वळवळत बाहेर येत होत्या. तो रक्तासारखा लाल असला तरीही डोळे हिरवेगार होते.तो येताना आजूबाजूला एक वेगळीच दुनिया तयार झाली होती. रात्रीच्या किर्र अंधारात किड्यांची किरकिर आणि वटवाघळांचे चित्कार तर घुबडांचे धुत्कार वाढले होते. तेही घाबरून चलबिचल झाले होते.ते अभद्र जे काही होते ते जर वाड्यात आले तर काय होईल याची कल्पनाच न करणे बरे.ते त्या बाळाला घेऊन जाणार होते कि त्याच्या कडून वेगळं काही घडवून आणले जाणार होते हे काळंच ठरवणार होते.
शुभदाला तीन महिने झाल्यापासून असे वाटतं होते कि आपल्या पोटात बाळ वाढतं नसून वेगळंच काहीतरी आहे.कधी कधी झोपेत तिला वाटे कि पोटातलं बाळ बाहेर आलं आणि काही वेळा नंतर ते परत आत गेलं.एकदा दोनदा ती दचकून उठून ही बसली.तर पोटावर रक्त लागलेल.पोटात दुखत असलेल.काही कळायचचं नाही.सातव्या महिन्यापासून तर बाळ आतून बोललेल वा हसलेल ऐकू यायचं ती घाबरून जायची.नवरा सुभाषला सांगितल तर तो म्हणायचा.तो तुझा भास आहे.बाळ अस कुठे करतात का? मग तीने ही गोष्ट जगत गुरुजींना सांगितली.त्यांनी एक धागा बांधायला दिला.त्या दिवशी तर शुभदाला त्याने भिंतीवर आपटून आपटून मारलं. तो धागा तोडायला लावला.बाळ मराव म्हणून तिने धोतऱ्याचे फळ खाल्ले त्या दिवशी तर तिला रक्ताच्या उलट्या झाल्या वरून तिला चार दिवस काहीच खाऊ दिलं नाही.शुभदा ने ओळखलं कि जे काही पोटात वाढत आहे ते अमानवी अभद्र आहे.आपल्या सासऱ्यांनी चुकीचे केलंय वारस मिळवण्यासाठी पण त्याचे परिणाम भयकंर होणार होते आणि भोगावे लागणार होते.
क्रमशः
सौ हेमा येणेगूरे पुणे
😮
❤️
👍
16