
Yuti's Hub Library
June 17, 2025 at 01:10 AM
कथा
त्रिकाल सत्य - एक गुपीत
भाग ३
ते अभद्र येता येता मधेच थांबल.त्याला मानवाच्या रक्ताचा वास आला.तो जवळच्या शेतात गेला.तेथे बाजेवर तिथला गडी शंकर झोपला होता. त्या अभद्राच्या तोंडातून असंख्य जिभा वळवळत बाहेर आल्या आणि शंकरच्या गळ्याभोवती आवळल्या गेल्या. शंकर ची जोरात चिख निघाली. तेवढ्यात मुंबईहून आलेला अमर जोशी याने ती चिख ऐकली.तो गाडी थांबवून पळत त्या शेताकडे गेला आणि समोरच दृष्य पाहून तो हादरून गेला.ते वेगळंच दिसणारं अभद्र असा प्राणी बघून तो घाबरला.तो शंकरला कडाकडा फोडून खात होता आणि हाडे फेकत होता.तो आपल्याला पाहिला तर आपल्यालाही खाईल या भितीने अमर पळत सुटला. गाडी जवळ आला पण गाडी चालू करू शकतं नव्हता.किक मारला जाऊ शकतं नव्हता. तेवढ्यात त्या अभद्राला त्याचा वास आला. तो तिकडेच यायला लागला.शंकरच अर्धवट शरीर फेकून निघालं ते अभद्र.अमरने कशीतरी गाडी सुरू केली आणि पळवली.बाहेर अंगणात गाडी टाकून तो तडक बाथरुम कडे पळाला.त्याच्या गाडीचा धाड असा आवाज ऐकून त्याचे आई वडील भाऊ बहिण,शेजारी राहणारे काका काकू त्यांची मुल बाहेर आली.पण तो कोणाला काही न बोलता आत पळाला.पण बाथरुम मधे जाताच त्याला काहीतरी आठवलं तो बाहेर आला आणि ओरडला.
"सगळे पटकन आत पळा आणि दारे खिडक्या घट्ट लावा.घरात धुप अगर बत्ती भरपुर लावा ,पळा."
" अरे काय झालं ते सांगतोस का ? अस भुत मागे लागल्या सारखं का पळतो आहेस."
बाबा त्याला विचारत होते. पण तो ओरडला," हो भुत च पाहिलयं नाही ,त्या पेक्षाही भयानक पाहिलयं.अहो त्या माधवकाकाच्या शेतावर एका माणसाला कडाकडा फाडून खाताना पाहिलयं त्याला.चार हात,चार डोळे कितीतरी जिभा,लालबुंद शरीर आणि बाहेर आलेले भयकंर हिरवे डोळे.त्याला माझा वास आला आणि तो ते खाता खाता फेकून देऊन माझ्या मागे आले.मी कसा तरी गाडी पळवत इकडे आलोय.लवकर अंघोळ करून अत्तर लावतो.तुम्ही आत पळा पटकन. " तो बोलतच होता तेवढ्यात वेशीकडे जोऱ्यात चिरकण्याचा आवाज आला. सगळे आत पळाले आणि दरवाजा खिडक्या लावू लागले.तसे आजूबाजूचे लोक ही करू लागले.पण काही लोक ज्यांना माहित नव्हतं ते त्याच्या तावडीत सापडू लागले.ते परचूरेच्या वाड्या कडे वळले आणि वाड्यात शुभदाला बाळ झाले.मुलगाच झाला होता. ते मुलं जन्मताचं दाईच्या हाताला चावलं आणि आईकडे बघून गुढ हसलं.दाईने घाबरून बाळाला हातातून फेकून दिलं.शुभदा बाळ गेलं समजून ओरडली पण बाळ जमिनीवर पडलं तरीही त्याला काही झालं नाही. ते हळूच उठलं आणि चालत चालत गेलं आणि पलंगावर चढून आईच्या शेजारी जाऊन झोपले.दाईतर घाबरून बाहेर पळून गेली आणि शुभदा बेशुद्ध झाली. दाई काहीन बोलता पळाली म्हणून सुभाष व सगळे घाबरून आत गेले.बाळ छान खेळत होते. हसत होते,हात पाय हलवत होते.सुभाषने पटकन पाहिलं ,मुलगा कि मुलगी.
"आई बाबा मला मुलगा झाला. आपल्या घराण्याचा वारस आला."
तो बाळाला धरून गोल गोल फिरवत हसू लागला.सगळे आनंदाने हसत होते आणि त्याच वेळेला बाळाचे हिरवे होऊन चमकत होते.
क्रमशः
सौ हेमा येणेगूरे पुणे
👍
😮
😢
🙏
7