Yuti's Hub Library
Yuti's Hub Library
June 18, 2025 at 06:10 AM
कथा त्रिकाल सत्य - एक गुपीत भाग ४ खरं तर ते अभद्र अमरच्या अंगणात आलं होतं. तिथ पर्यंत त्याला अमरच्या शरीराचा वास आला होता.तो दरवाज्याकडे येणार इतक्यात त्या बाळाने जन्म घेतला होता. त्याची जाणीव त्या अभद्राला झाली होती. त्यामुळे तो तेथून निघून परचुरे वाड्याकडे निघाले होते. परचूरेच्या वाड्यात आनंद साजरा होत होता. जी दाई घाबरून वाड्या बाहेर पळाली ती त्या अभद्राच्या तावडीत सापडली.त्याने तिला वाड्याच्या दारातच फोडून खाल्ल.बाळाचे डोळे अजूनही चमकत होते. शुभदाला हळूहळू शुध्द येत होती.पण ती बाळाला मागत नव्हती. " अरे सुभाष एवढा चांगला मुलगा झाला ,मग ही दाई अशी पळून का गेली रे." " अग आई तिला काहीतरी दिसलं असेल." असे म्हणून सुभाष हसू लागला. आई पण हसू लागली.बाबा मात्र घाबरले होते. ते अभद्र जसे वाड्या जवळ आले तसे सुभाषला ते जाणवले.त्याने पटकन बाळाला आईकडे देऊन तो बाहेर आला. बाहेर वातावरण बदलले होते.काळे ढग जमून आले होते. जोरात हवा वाहत होती.एक तत्सम आभास की आज रात्री काही विपरीत घडणार होतं. अचानक काळे मेघ काहीतरी काळी छाया घेऊन येत होते. सुभाषने डोळे बंद केले आणि बाहेर काय आहे हे पाहू लागला. त्याला मनचक्षूत ते अभद्र दिसले.तो नखशिखांत हादरला.हा इथे कसा? हा तर त्या पडक्या खंडरातील तळघरातील एका भुयारी खोलीतील विवरात राहणारे अमानवीय आहे.मग हे बाहेर कसे आणि इथे कसे? त्याच वेळेला पलिकडच्या गच्चीवर थांबलेला मांत्रिक खदाखदा हसत होता.एक तर सुभाषच्या वडिलाने त्याला मारून गावातून हाकलून दिले होते. पण त्या नंतर सुभाष ही त्याच्या कडे गेला नव्हता.त्याला शिकवलेल्या विद्येचा मोबदला तर दिलाच नव्हता.पण दुसऱ्या मांत्रिकाकडून विद्या शिकून घेतल्या होत्या. मांत्रिकाला हे माहित नव्हते कि सुभाषने सगळ्या विद्या शिकून घेतल्या आणि वषीभुत कलापण शिकली होती.त्याला माहित होते कि या अभद्राला वश करू शकतं नाही पण सुभाषने मांत्रिकाला वश केले.मांत्रिक हळूहळू खाली उतरून आला आणि सुभाषच्या आदेशाची वाट पाहू लागला. सुभाषने मांत्रिकाला अजस नहूचे मंत्र म्हणायला लावले.सुभाषही त्याच्या सोबत म्हणू लागला तसे ते अभद्र ओरडू लागले.हळहळू ते शांत झाले.पण त्याला त्या खिंडारापर्यंत नेणं अवघडं होतं.मग शेवटी सुभाष आणि मांत्रिकाने त्याला ओढत ओढत वाड्याच्या मागच्या दाराने आत नेऊन तिथल्या तळघरात बंद केलं. सुभाषने तेथेच चुक केली. कारण त्याच बाळ हे त्याचाच अंश होता.त्याला येथे ठेवणे चुकीचे होते.तसेच ते बाहेर पडले तर वाड्यातील लोकांना काय करेल आणि बाळात आपले गुणधर्म सोडेल याची जाणीव सुभाषला नव्हती.सुभाषने विचार केला.आज याला येथे ठेवावे दोन दिवसांनी पोर्णिमा येत आहे त्यादिवशी याची ताकत कमी होईल तेंव्हा रात्री गाडीत घालून घेऊन जाऊ.पण त्या दिवशी काय घडणार आहे हे सुभाषला ही माहित नव्हते. इकडे वाड्यात शुभदा बाळाला जवळ घ्यायला तयार नव्हती. सासू तिच्या कडे बाळ देऊ लागली तर घाबरून" नको त्याला माझ्या कडे देऊ म्हणून ओरडायला लागली.हे बाळ मानवी नसून अमानवी आहे.मी डोळ्याने बघितलं आहे.दाईपण बाळाला टाकून पळून गेली. " " ये सुनबाई काय वेड्या सारखं बोलतेस ,अग गेला अर्धातास आमच्या कडे आहे ते.बघं किती छान खेळतय.घे जवळ घे पाजव त्याला." सासुने बाळाला बळजबरीने तिच्या कडे दिलं. बाळ आता नार्मल वाटतं होतं. शुभदाने त्याला पाजायला सुरू केले. सासू सासरे बाहेर निघून गेले.तेवढ्यात शुभदा च्या उरोजात आग होऊ लागली. ती जोरात ओरडली ,आई ग.आणि बाळ खदाखदा हसायला लागले.शुभदा परत घाबरून बेशुद्ध पडली. बाळ पलंगावरून खाली उतरले आणि उडी मारून पाळण्यात झोपले.पाळणा आपोआप हालू लागला आणि बाळ झोपी गेले. क्रमशः सौ हेमा येणेगूरे पुणे
👍 😮 😢 🙏 7

Comments