
Yuti's Hub Library
June 18, 2025 at 07:29 AM
आयुष्यात दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात एक म्हणजे स्वतःच मन जपणं आणि दुसरी म्हणजे स्वतःच कर्म ओळखणं कारण या गोष्टीवर आपलं संपूर्ण जीवन अवलंबून असतं..!
स्वतःचे मन जपणे म्हणजे नेमक काय आणि ते का गरजेचं असते ? तर मित्रांनो कुठलाही माणूस मन मारून जगू शकत नाही अशा जगण्यात त्याला ना समाधान प्राप्त होते ना कोणते सुख तो उपभोगू शकतो
याचं साठी स्वतःच्या मनाला काय पसंद आहे,
काय करायचं आहे अगदी काय खायचं प्यायच आहे, अशा छोट्यातल्या छोट्या ते मोठ्या निर्णयापर्यंत आपण आपल्या मनाचं ऐकायचं असतं आपल्या मनाचा विचार करायचा असतो जर अस केलं तरच आपण मनापासून सुखी आयुष्य जगू शकतो नाहीतर आयुष्यभर आपल्यावर मन मारून जगण्याची वेळ येते.
म्हणून आयुष्यात इतरांच्या नाही तर स्वतःच्या मनाला जपा.
आणि दुसरी गोष्ट आपण जी वरती पाहिली ती म्हणजे कर्म ओळखणे..
हो मित्रानो गरजेचं आहे आपल कर्म ओळखणे पण ते कधी
https://whatsapp.com/channel/0029VaDinBXFcowDhOwBNW0y
ते करण्यापूर्वीच कारण आपल्या सोबत होणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टी ह्या
आपण केलेल्या कर्मांचा वाईट फेरा जो फिरून आपल्यावरच आलेला असतो. हे लोकांना समजत नसतं त्यामुळे ह्या दुनियेतील प्रत्येक माणूस त्याच्या जीवनात आलेल्या वाईट वेळेमुळे त्याच्या नशिबाला दोष देत बसतो की माझं नशीबच वाईट आहे. तर आपलं नशीब वाईट नसतं, वाईट असतं ते आपले कर्म, जे आपण पेरत असतो तेच उगवत असतं आणि तेच आपण वेळोवेळी भोगत असतो त्यामुळे कर्म वेळेवर ओळखणं गरजेचं आहे.
म्हणूनच स्वतःच मन जपणं आणि कर्म ओळखणं ह्या दोन गोष्टी जीवनात खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या प्रत्येकाने आत्मसात केल्या पाहिजेत.
🙏
👍
8