
Yuti's Hub Library
June 19, 2025 at 01:09 AM
कथा
त्रिकाल सत्य - एक गुपीत
भाग ५
शुभदाला जेंव्हा जाग आली तेंव्हा सकाळ झाली होती. गंगुबाई बाळाला मालीश करत होती. बाळ बोटे चाखत हां हू करत खेळत होते. रात्री जसे बाळ वाटतं होते.तसे ते बिलकुल नव्हते.आपल्या सारखे साधारण होते. डोळे ही काळे होते.छान असे हसत होते.शुभदा डोळे फाडून फाडून त्यांच्या कडे पाहत होती.
" ओ वहिनीसाब अस काय डोळ फोडून बघताय बाळा कड.आव पोरगं झालय तुम्हाला पण चेहऱ्यावर आनंद दिसत नाय.आव आता चिंता मिटली बघा.या वाड्याला वारीस मिळाला बघा.नाही तर तुम्हाला पण सवत आली असती बघा.आव मी माझ्या या डोळ्यांन पाहिलयं राधाबाईला सवत आल्यावर रडताना.बघा कस खुदुखुदू हसतोय आगाव."
गंगुबाई बडबड करत होत्या,शुभदा मात्र अजूनही बाळाकडे डोळे फाडून पाहत होती.
"आव काय पाहतात,उठा की आवरा लवकर. याला अंधुळ घातली की तुम्हासनी घालते बघा अंधुळ.जरा तेल लावून चोळते बी.वाईस अंग जरा मोकळ होईल. जा तोंड धूवून या."
" हं"
शुभदा बाळाकडे पाहत पाहतच आवरत होती.ती स्वच्छ होऊन आली.तो पर्यंत बाळाला अंघोळ घालून झाली होती. त्याला पाळण्यात कापड बांधून टाकलं होतं.त्याच्या डोळ्यावर झापडं होती.शुभदाला तेल लावून अंधोळ घालून गंगूबाई गेली.त्यानंतर सासू व नवरा तिच्या खोलीत आले.सासूने तिच्या साठी गरम गरम बदामाचा शिरा केला होता, तोही तुपातला.
तळघरातलं ते अभद्र शांत होतं कारण त्याला सुर्यप्रकाश सहन होत नसल्याने ते बाहेर येण शक्य नव्हते .
सुभाष ही एकदा त्याला पाहून आला होता.शक्ती नसल्याने तो मलूल होऊन पडला होता. सुभाषला वाटलं इथे बंद केल्याने आणि अजस नहूचे मंत्र म्हणल्या मुळे ते शांत झाले आहे.पण ते चुकीचे होते. ते अभद्र पाताळातील अंधाऱ्या विवरात राहणारे होते.सुर्याच्या प्रकाशाशी त्याचा संबध नव्हता.अनादिकालापासून तो पाताळात राहत होता.पण काही लोकांनी आपल्या स्वार्थासाठी अघोरी मांत्रिकाच्या साह्याने त्याला या भुतलावर बोलवलं होते.याने आता पर्यंत म्हणजेच सहा वर्षापुर्वी पर्यंत त्याने खूप भयानक त्रास दिला होता. तेंव्हा केरळमधील कोणी व्यकंय्या स्वामी या गूरुजींना बोलावून दहा दिवस पुजा अर्चा करून त्याला गावाबाहेरील पडक्या किल्ल्याच्या खंडरातील तळघरातील एका दगडी विवरात कायमचे बंद केले होते मग हा बाहेर कसा आला कि कोणी त्याला बाहेर बोलवले होते.पण हे चुकीचे झाले होते.
अनेकदा अनेक लोक आपल्या स्वार्थासाठी मागचा पुढचा विचार न करता,होणाऱ्या भयकंर परिणामांचा विचार न करता.किंवा एखाद्याचा बदला घेण्यासाठी कोणत्याही थराला जातात.शेवटी आपला तर जिव गमवतातचं पण नाहक अशा अनेक निष्पाप लोकांचाही बळी देतात.असचं काहीतरी त्या मांत्रिकाने केलं होतं पण पुढे त्याला खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार होते.
सुभाष बाळाला पाहून बाहेर आला तर वाड्या बाहेर व गावात जोरजोरात रडारड चालू होती. काय झालयं म्हणून सुभाष वाड्या बाहेर आला आणि समोरचे दृष्य पाहून नखशिखांत हादरला.दाईच्या शरीराच्या चिथड्या चिथड्या उडाल्या होत्या. चेहरा लांबवर जाऊन पडला होता. हाडे विखूरली गेली होती. मास नावालाच शिल्लक होते.धडाला पाहिले तर दाईचे डोळे घाबरलेले आणि विस्फारलेले दिसत होते. जणू तिने भयकंर काहीतरी पाहिले होते. तेथेच अमर थरथर कापत थांबला होता. त्याला रात्रीचा प्रसंग डोळ्या समोर दिसत होता.
" तोच आहे,त्यानेच हे काम केलंय. मी रात्री माधवकाकाच्या शेतावर एका माणसाला फोडून खाताना पाहिलयं. खुप विचित्र होते ते.न मानव ना दानव,काहीतरी अभद्र अमानवीय.चार डोळे,चार हात,असंख्य जिभा,हिरवे डोळे आणि लाल बंद शरीर मध्यभागी फुटबौल सारखं शरीर .अंगावर मगरी सारख्या खवल्या. मागे लांब शेपटी पण दोन पायावर चालत होते. पायतर खुपच पसरट .जसे बेंडका सारखे पण आकाराने मोठे." अमर हे सांगतच होता.तेवढ्यात जगत गुरुजी तेथे आले.परचुरे मालक ते तेच आहे.जे सहा वर्षापुर्वी किल्ल्याच्या खंडरातील तळघरातील एका विवरात गाडले गेलेले अभद्र.कोणीतरी त्याला बाहेर काढले आहे. त्याने काल आठ जणांचा बळी घेतलाय.परत तेच सत्र सुरू झाले आहे.मी केरळच्या व्यकंय्या स्वामीना फोन केला आहे.ते येतीलच पण आधी आपल्याला शोधले पाहिजे तो कोठे आहे. कि परत किल्ल्यावर गेले आहे.बाहेर असेल तर रात्री कोणीही घरा बाहेर पडायचे नाही.दिवसा ते काही करत नाही. दिवसा त्याची शक्ती कमी पडते.पण रात्री ते भयकंर होते.तेंव्हा सगळ्यांनी काळजी घ्या. देवांचे जपतप सुरू करा.रात्र होण्यापुर्वी घराभोवती आठवणीने गंगाजल सिपंडा.काळजी घ्या मी निघतो."
सगळे घाबरले पण आपल्याच घरात ठेवलेल्या सुभाषला मात्र कसलीच भिती वाटतं नव्हती.शुभदाने गुरूजीने बोललेले ऐकले आणि लगेच गड्या सोबत आपल्या तिनी मुलींना मामाच्या गावी पाठवून दिले. सुभाषने अडवले ही नाही.
क्रमशः
सौ हेमा येणेगूरे पुणे 🙏🏻
👍
🙏
7