Yuti's Hub Library
Yuti's Hub Library
June 19, 2025 at 05:06 PM
कथा त्रिकाल सत्य - एक गुपीत भाग ६ शुभदाला राहून राहून वाटतं होते कि काहीतरी ‌ भयकंर घडणार आहे. पण तिला हे माहित नव्हतं कि आपल्याच घरात ते अभद्र आहे. सुभाष मात्र आपल्या शक्तीवर अति अभिमान करत शांत होता. जगत गुरुजींनी व्यकंय्या स्वामीना फोन करून सगळं सांगितलं होतं. पण त्यांची तब्येत ठिक नसल्यामुळें त्यांनी आपल्या शिष्याला म्हणजेच रंगय्या स्वामींना पाठवलं होतं.तस पाहिलं तर हाळी गाव अतिशय छान व सुंदर अस नदी किनाऱ्या वरचं गाव.नदीच्या काठावरचं महादेवाचे छानस् मदिंर.नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर थोडेसे दुरवर बैठा किल्ला किंवा भुयकोट किल्ला.पण सध्या भग्न अवस्थेत असलेला ,खण्डर बणलेला होता.तेथेच या अभद्राला डांबून ठेवलं होतं. पण आज ते परचुरे च्या वाड्यात होतं.परचुरे चा वाडा ही दिडशे वर्ष जुना होता.बाहेरून संपुर्ण दगडी बांधकाम तर आतून शिसवी लाकडाचे काम.जसे जुन्या काळात पेशव्यांचे वाडे जसे असत तसे.आतल्या भिंती सोडल्यातर सगळी कडे लाकडी काम केलेलं. रंगय्या स्वामी येईपर्यंत जगत गुरुजींनी सगळ्या स्री पुरुषांना घेऊन सहस्त्र नामजप सुरू केला होता. रुद्रजपनाम,कारक जप मंत्र,अमोघमंत्र,गायत्री मंत्र,अजस नहूचे मंत्र, हनुमान चालिसाचे पठन.असे अनेक मंत्र जप न चालू होते.या गोष्टीचा त्या अभद्रा बरोबर सुभाष आणि बाळालाही त्रास होऊ लागला. कारण सुभाष मधे कमी पण बाळात खुप अंश अमानवी होते.रात्री याचा त्रास कमी व्हावा म्हणून पुजा करणे जरुरीचे होते. पण सर्व लोक मंदिरात थांबणे शक्य नव्हते. ज्या घराला गंगाजलाचे कुपंण केलेले नसे तिथल्या घरचे लोक गायब होऊ लागले.पण त्यांचे अर्धवट शरीर व हाडे आता कोठेही सापडत नव्हते.पण परचूरेच्या तळघरात वाढतं होते.वाड्यात एक अजीब असा घाणेरडा असा वास पसरला होता. कोणी काही म्हणत नसले तरीही नाकाला कापड लावून फिरत होते.शुभदाला आणि तिच्या सासू सासरे व नवरा यांनाही जाणवत होता.त्या दिवशी दुपारी सगळे आराम करत असताना सुभाष तळघराकडे जाताना दिसला.शुभदा हळूहळू आवाज न करता मागे मागे गेली.आतले दृष्य पाहून घाबरली.ती परत वळणार इतक्यात तिला वरून खाली येणारी पावले वाजली.ती तेथेच अंधारात लपली.कोण आलं आहे म्हणून पाहू लागली तर सासूबाई खाली येत होत्या. सासू बाई तळघरात गेल्यावर ,शुभदा परत आत वाकून पाहू लागली. " सुभाष " " आई तु येथे,कशाला आलीस .येथे ते अभद्र आहे. बाळ जन्मले त्या रात्री हे येथे आले आहे.दाईला व गावातल्या लोकांना यानेच खाल्लय.तुला माहित आहे का ? तु ज्या मांत्रिका कडून मला मागूण घेतलंस .त्यानेच बाबाचा बदला घेण्यासाठी मी मुलगा मागितल्यावर याचा अंश शुभदा च्या व माझ्या पोटी पाठवला.म्हणून हे अभद्र आपल्या बाळाला पाहण्यासाठी व नेण्यासाठी येथे आलं.पण मी ते होऊ देणार नाही. मी मांत्रिकाला वश केलंय आणि त्याच्या साह्याने या अभद्राला अजस नहूचे मंत्र म्हणून काबूत केलंय. उद्या पोर्णिमा आहे.याची शक्ती रात्री पण कमी असेल तेंव्हा याला त्या किल्ल्याच्या खंडरातील तळघरातील एका विवरात सोडून येतो आणि त्याचे तोंड कायमचे बंद करतो." शुभदा ते ऐकून तर लटलट कापायला लागली.तसेच तिला प्रचंड रागही आला होता.एकतर आपले अमानवी अंश असलेल्या माणसा सोबत लग्न लावले.एवढेच नाहीतर त्याच्या कडून मुलही जन्माला घातली. आपल्या सासूने मुलाच्या हव्यासा पोटी चुकीचा मार्ग निवडला आणि तसल्या मुलाला जन्म दिला. आता नातवाच्या हव्यासा पोटी मुलाला हाताशी धरून परत चुकीचा मार्ग निवडला. पण हा अतिशय धोकादायक होता.जो सर्वांच्या जिवावर बेतणार होता.शुभदा तेथून लागलीच बाहेर पडली.ओली बाळातीण बाहेर जाऊ देणार नाहीत म्हणून तोंडावर कपडा बाधूंन व डोक्यावरून शाल लपेटून मागच्या दाराने मंदिराकडे गेली.तिने तळघरात जे पाहिलं आणि ऐकलं ते जगत गुरुजींना सांगितलं. " होय बेटा मला सगळं माहित झालयं. त्यातूनच कसा मार्ग काढायचा याचा विचार करत होतो.पण तुझ्या नवऱ्याने त्याला वाड्यात नेऊन खुप चुकीचे केले आहे.तो तेथून जाणारचं नाही कारण त्याचा अंश असलेले त्याचे बाळ तिथे असे पर्यंत. माफ कर शुभदा पण हे बाळ तुझे नाही.तो पुर्णतहा त्याचे आहे.जे पुढे जाऊन याच्या सारखेचं वागणार.त्याचा मोह तुला सोडावा लागणार. मान्य आहे कि त्याला तु जन्म दिला आहेस.अस कस सोडणार.पण तुला ते करावचं लागेल.दुसरा पर्याय नाही. तुझ्या मुलीत त्याचा वा सुभाषच्या अमानवी घटकांचा अंश नाही.बरे केलसं त्यांना येथून बाहेर काढलसं.आता परचुरे साहेबांना ही काही कारणास्तव येथून दुर पाठव.पण तुला थांबाव लागेल.या बाळाला मुक्ती तुलाच द्यायची आहे.ते अभद्र तुला काही करणार नाही कारण तु त्याच्या बाळाची आई आहेस." " नाही गुरूजी,मीच माझ्या मुलाला कसे ठार मारू.त्या पेक्षा मी मेलेली बरी." " तु मेलीस तर तु सुटशील.पण ते बाळ गेलं तर हे गाव सुटेल.आता तु घरी जा.मी म्हटल्या प्रमाणे कर.परचुरे साहेबांना लांब कोठेतरी पाठव.लवकरच रंगय्या स्वामी येतील.तेंव्हा सगळं निपटेल.यात किती नाते टिकतील आणि किती दम तोडतील ते देवचं जाणो.पण तुला खंबीर व्हावचं लागेल.तुझ्या घरासाठी,घराण्यासाठी,मुलीसाठी." शुभदा मान हलवून घरी आली पण, तिच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते.ं नऊ महिने आपल्या पोटात वाढवलेल्या आपल्या पोटच्या गोळ्याला कोणत्या आईला मारावे वाटेल.पण शुभदाला ते करावे ‌ लागणार होते. दुसऱ्या दिवशी वाड्याच्या अंगणात, तळघराकडे जाणाऱ्या वाटेवर शुभदा च्या सासूचे प्रेत पडलेले दिसले.त्याचीही तिच अवस्था झाली होती. जी इतर सगळ्या मेलेल्या लोकांची झाली होती. पोलिस येऊन बयनामा लिहून जायचे.पण निष्पन्न काहीच नाही. सुभाष मात्र खुप चिडला.तो जंगलात जाउन कसल्यातरी पुजा करू लागला.त्याच वेळेला शुभदाने सासऱ्यांना सगळं सांगितलं. त्यांचा या गोस्टीवर विश्वास बसत नव्हता. म्हणून मग शुभदाने त्या अभद्राला सासऱ्यांना दाखवले व जगत गुरुजींनी काय सांगितलं ते सांगितले.शुभदा चे सासरे त्याच दिवशी तिर्थयात्रेला निघून गेले.शुभदा देऊ शकेल का ? येणाऱ्या संकटाला तोंड. क्रमशः सौ हेमा येणेगूरे पुणे
🙏 👍 ❤️ 8

Comments