
Yuti's Hub Library
June 21, 2025 at 12:08 PM
कथा
त्रिकाल सत्य - एक गुपीत
भाग ७
आज शुभदाला खूप भिती वाटतं होती.कारण वाड्यात काम करणारे गडी सासू मेल्या पासून कमी झाले होते. एक दोनच कामाला येत होते.गंगूबाई मात्र दररोज येत होती.पण आज सासरे व लेकर घरी नव्हते.नवरा काल पासून गायब होता.आज रात्री शुभदा वाड्यात एकटीच होती.तिने गंगूबाईला झोपायला बोलवले पण तिने स्पष्ट नकार दिला. गड्यांनाही वाड्यातच झोपायला सांगितले.पण ते घाबरून नको म्हणाले.आज पोर्णिमा होती.शुभदा शेवटी जगत गुरुजीं कडे गेली. ते म्हणाले, तु घाबरू नको,पाहिजे तर मी वाड्यात बसून जप करेन तु शांत झोप.पण शुभदाला झोप कसली येते.वरून बाळाचीपण भिती वाटतं होती.दिवसा शांत शांत असणार बाळ रात्री आठ दिवसाचं वाटतचं नसे.इतक विचित्र वागायचे कि एखाद्या ने त्याला चालताना पाहिले तर ह्र्दय विकाराने मरेलचं.एवढा तिव्र झटका येईल त्याला.शुभदा आज तिच्या खोलीत गेलीच नाही.तिने देवघरात चटई टाकली आणि झोपली.बाळ देवघरा पर्यंत आलं आणि परत गेलं.कारण ते आत येत असताना त्याला तिव्र झटका बसला.ते रागात बघत निघून गेलं.दुरवर जाऊन खि खि हसू लागलं.मग हळूहळू तळघराच्या पायऱ्या उतरून खाली गेल.थोड्या वेळाने बाळाच्या हसण्याचा, खेळण्याचा आवाज येऊ लागला.शुभदाने गळ्यात जगत गुरुजींनी दिलेला गंडा बांधला आणि हळूच ती तळघराकडे गेली.तिने वाकून पाहिले तर बाळ त्या अभद्राच्या मांडीवर खेळत होते. ते अभद्र आपल्या असंख्य जिभा काढून त्याला चाटत होतं.त्यामुळे ते हसत होतं. शुभदाला ते किळसवाणे वाटतं होते.तसेच तिला भितीही वाटतं होते.ती पळतचं देवघरात गेली आणि लटलट कापत डोळे बंद करून पडली.घाबरून झोप तर येत नव्हती.रात्रीच्या शांततेत जगत गुरूजींचा आवाज घुमत होता.मध्य रात्र झाली आणि त्या अभद्राच्या ओरडण्याचा आवाज येत होता. सुभाष त्याला ओढून नेत होता आणि ते जायला तयार नव्हते.तसेच एका हातात बाळाला पकडले होते. सुभाष ते बाळ काढून घेण्याचा प्रयत्न करत होता. बाळाला ओढलेलं त्या अभद्राला आवडत नव्हतं. सुभाषला लवकरात लवकर त्या अभद्राला वाड्यातून बाहेर काढायचं होतं. पोर्णिमा तीन नंतर संपणार होती.सुभाष पण काहीतरी मंत्र म्हणत होता.वाड्यात जोरजोरात आवाज होत होता. बाहेर गावात काहीच आवाज येत नव्हता.
शुभदा तर देवाला पकडून बसली होती. तेवढ्यात सुभाष ची जोरात आरोळी ऐकायला आली.शुभदा घाबरून बाहेर आली.पाहते तर काय ते अभद्र सुभाषला उचलून भिंतीवर आपटत होता.तरीही सुभाष मंत्र म्हणायचा थांबत नव्हता.सुभाषच्या डोक्यातून रक्त वाहत होते.शुभदाला काही कळाले नाही. ती पळतचं देवघरात गेली आणि देव्हाऱ्यात ठेवलेल गंगाजल उचल्लं आणि बाहेर येऊन त्या अभद्राच्या अंगावर फेकलं.ते अभद्र जळाल्या सारखे ओरडले आणि बाळ व सुभाषला टाकून तळघरात निघून गेलं. बाळही पाणी अंगावर पडल्याने चिरकत होतं.सुभाष मात्र तिच्या कडे रागात पाहत होता.
" काय केलसं हे ,मी त्याला वाड्रा बाहेर काढत होतो.थोड्स लागला मला तर चाललं असतं .पण हे भंयकर धुड काय करेल माहित नाही. सगळ्या मेहनतीवर पाणी फेरलस.काय टाकलस हे सगळं शरीर जळजळतयं."
" गंगाजल"
" मुर्ख आहेस का? काहीही करत बसतेस."
एवढं म्हणून सुभाष बाळाला शुभदा कडे देऊन परत तळघराकडे गेला.बाळ डोळे लाल करून जाणाऱ्या सुभाष कडे पाहत होते.शुभदा च्या हातात अजूनही गंगाजलची वाटी होती.तसेच असताना बाळाला तिच्या हातात दिले.बाळाला त्या वाटीचा पाठीला चटका बसला बाळ पटकन खाली उडी मारून आपल्या खोलीत निघून गेले.समोरच्या ओसरीत बसलेले जगत गुरू आश्चर्याने त्याच्या कडे पाहत होते.
ते पटकन उठले आणि शुभदाकडे आले.
" बघं शुभदा,तुला म्हटलों होतो ना कि हे बाळ साधारण नाही.त्या अभद्रा चे मुलं आहे.कोणते बाळ पंधरा दिवसात आपल्या पायावर चालत जाते किंवा टुणकन उडी मारते."
" हं"
शुभदा अजूनही धक्क्यात होती. तिचे तर डोके चालत नव्हते.दोन वाजून गेले होते. झोप नसल्याने डोके दुखत होते.अजून पुढ्यात काय वाढून ठेवलय हे तिलाही माहित नव्हते. ती हताश होऊन देवघरात निघून गेली.
क्रमशः
सौ हेमा येणेगूरे पुणे
👍
🙏
6