
Yuti's Hub Library
June 21, 2025 at 03:32 PM
चिडलेली पत्नी आपल्या शिक्षक नवऱ्याला म्हणाली, "तुम्ही मला कधीच बाहेर जेवायला नेत नाही… आज रात्री आपण बाहेर जेवायला जाऊया."
मास्तर – "ठीक आहे, जवळच्या हॉटेलमध्ये जाऊ."
पत्नी – "नाही… एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊ."
मास्तर – (एक क्षण विचार करून) "ठीक आहे… संध्याकाळी ७ वाजता निघूया."
ठीक ७ वाजता दोघं गाडीतून निघाले…
रस्त्यात मास्तर म्हणाले –
"तुला माहितीये का… एकदा मी माझ्या बहिणीसोबत पाणीपुरीची स्पर्धा केली होती. मी ३० पाणीपुरी खाल्ल्या आणि तिला हरवलं."
पत्नी – "अरे, एवढं काय कठीण आहे त्यात?"
मास्तर – "माझ्यासारख्या माणसाला पाणीपुरी स्पर्धेत हरवणं फार अवघड आहे."
पत्नी – "मी तुम्हाला सहज हरवू शकते."
मास्तर – "अगं ते तुला शक्य नाही…"
पत्नी – "स्पर्धा करायचीच आहे आता!"
मास्तर – "म्हणजे तू स्वतःला हरलेलं बघायचं ठरवलं आहेस का?"
पत्नी – "चालेल, बघूया मग!"
ते दोघं एका पाणीपुरी स्टॉलवर थांबले आणि स्पर्धा सुरु केली...
२५ पाणीपुरींनंतर मास्तरांनी खाणं थांबवलं.
पत्नीचं पोटही भरलं होतं, पण तिनं एक पाणीपुरी जास्त खाल्ली आणि ओरडली,
"तू हरलास!"
बिल आलं – ₹१००
मास्तर – "चला, आता हॉटेलमध्ये जेवायला जाऊया."
पत्नी – "नाही आता पोटात जागाच नाही उरली… चला घरीच जाऊ ."
(दोघं घरी परतले)
पत्नी मात्र ‘मी जिंकले ’ या समाधानात खूश होती. 😜😜😜
आणि मास्तर तिच्या कडे बघून गालातल्या गालात हसत होते, "चला बुवा...१०० रुपयात उरकलं "😜😃
लक्षात ठेवा.... "एक शिक्षक फक्त अभ्यास शिकवत नाही…
कधी कधी घरात 'बजेट'ही शिकवतो…
ते पण मोठ्या हुशारीने! 😂😂
Weekend special😀😀
😂
👍
😮
16