Yuti's Hub Library
Yuti's Hub Library
June 22, 2025 at 01:45 AM
कथा त्रिकाल सत्य - एक गुपीत भाग ८ शुभदाला आपल्या नवऱ्याचं व मुलाचं‌ गुपीत कळाल्याने नाराज होती. इतक्या वर्षाने तिला मुलगा झाला होता. आता नवऱ्याचे व सासूचे टोमणे कमी होतील. नवरा दुसरे लग्न करायचा विचार करणार नाही. आता सगळं चांगले होणार या आनंदात असताना आपला नवरा व मुलगा मानवी नसून अमानवी आहेत.आपण अशा नवऱ्या सोबत दहा वर्ष संसार केला.आता मुलगाही तसलाच नव्हेतर त्या पेक्षाही भयकंर निघाला. ती आतून नाराज झाली. कितीतरी वेळ ती विचार करत बसली आणि जेंव्हा तिचे डोळे उघडले तेंव्हा सकाळचे दहा वाजले होते. गंगूबाई तिला आवाज देत होती. "आव बाई साब बाळ कुठ हाय जी.त्याला तेल लावून अंधुळ घालते.तुम्ही असे देवघरात झोपलासा,बाहेर ओसरीत जमीनीवर तसेच मालक झोपलेती.मग बाळ कुठ हाय " " ते खोलीत पाळण्यात आहे." " नाही जी,मी तिथं जावून आले." ती आणि शुभदा बोलत असताना, जगत गुरुजींचे बोबडे बोल ऐकू आले.तिकडे पाहिले तर जगत गुरुजींच्या समोर खाली जमिनीवर संतरजीवर बाळ झोपले होते. ते मस्त हसत खेळत पाय हात हलवत होते. गुरुजी त्याला खेळवत होते.रात्री जे बाळ पाहिले ते आता मुळीच नव्हते.गुरूजींनी त्याच्या हातात, पायात व गळ्यात कसले तरी ताईत बांधले होते.तरीही ते बाळ शांत होते.म्हणजे त्या बाळावर दिवसा त्या अभद्रा ची छाया पडत नसे.शुभदाला वाटतं होते.काहीतरी असे घडावे आणि आपल्या बाळाच्या अंगातून ते अभद्राचे अंश निघून जावे.आपले बाळ आपल्याला मिळावे.पण ते कसे शक्य होणार होते.अजून रंगय्या स्वामी पण आले नव्हते.ते आल्या वर अजून काय काय घडणार होते.तेवढ्यात वाड्या बाहेर गलका ऐकू आला.सुभाष ,शुभदा व जगत गुरुजी बाहेर पळाले.बाहेर नारायणची बायको छाती बडवून रडत होती. " अहो मालकीन बाई तुमच्या नवऱ्याला सांगा बर,गुमान माझ्या मुलाला परत दे म्हणून. कुठ हाय ते सांगा म्हणाव.काल रातीला कसलीतरी पुजा करायची म्हणून त्याला नेले होते. पुन्हा तो परत आलाच नाही.यो भुत हाय भुत.रातीला स्मशानात पुजा करतयं.ह्यानंच माझ्या मुलाला गायब केलंय. " " ओ शांता काकी ,तुमचा मुलगा माझ्या सोबत आला होता.पण पुजा झाल्या वर आम्ही गावात परत आलो.तो आपल्या घरी गेला मी माझ्या घरी आलो.मी काहीही केलेलं नाही. बघा असेल इथेच कुठे.किंवा गावात आधीच लोक गायब होतं आहेत.तो पण झाला असेल. उगीच माझ्या वर आळ घेतायं" ती शिव्या शाप देत तेथेच थांबली. खर तर सुभाषने त्याला नको म्हणत असताना बळजबरीने वशीभुत करून नेले.नेताना त्याला वाटले कोणी पाहिलं नाही.कारण तो ऐकटाच घाबरत घाबरत बाहेर ‌ शौचाला जात होता.तेवढ्यात त्याची आईही त्याला पाहण्यासाठी बाहेर आली.तिने आपल्या मुलाला त्याच्या मागे मागे जाताना पाहिले. पण सुभाषने त्याला स्मशानात नेऊन पुजेसाठी बळी दिला होता. पुजावेदीवर त्याचे रक्त चढवले होते.पुजा झाल्यावर त्याचे शरीर उचलून आणून त्या अभद्रा समोर फेकले होते.त्याने त्याला कडकड फोडून खाल्ले होते.यात सुभाष खुप थकला होता.त्याला पायऱ्याही चढता येत नव्हत्या. तो कसाबसा ओसरीवर चढला आणि तेथेच झोपी गेला. शुभदाला माहित होते कि एकतर नवऱ्याने काहीतरी केले किंवा त्या अभद्रा ने खाल्ले. ती गुपचुप आत निघून गेली.सुभाष परत तयार होऊन कोठेतरी निघून गेला. दिवस असाच निघून गेला. आजही जगत गुरुजी जप करण्यासाठी वाड्यात आले.रात्र वाढत गेली आणि बाळ जोरजोरात चिरकू लागले.रडू लागले.बाळाच्या सर्वांगाची आग होत होती. आग लागल्या सारखे हात पाय,गळा दिसत होते.जगत गुरुजींच्या दोऱ्याने‌ ते होतं होते.ते बाळ धडपडत तळघराकडे गेले.शुभदा जोरात ओरडली.संकेत बेटा थांब जाऊ नको खाली.आज तिने बाळाला नाव दिले. पण ते न ऐकता खाली गेले.शुभदा भारावल्या सारखी त्याच्या मागे गेली.आत पाहते तर काय बाळ आपली आग शांत करण्यासाठी त्या अभद्राने आणलेल्या मानवाचे रक्त पीत होते.शुभदा जोरात किंचाळली व बेशुद्ध होऊन पडली.ते अभद्र पळतच तिच्या कडे आले पण काहीही न करता परत गेले.थोड्या वेळानी तिला शुध्द आली आणि ती पळतच वर आली.ती घाबरून देवघरात जाऊन बसली. क्रमशः सौ हेमा येणेगूरे पुणे
👍 🙏 4

Comments