CMO Maharashtra WhatsApp Channel

CMO Maharashtra

2.6M subscribers

Verified Channel

About CMO Maharashtra

महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत WhatsApp चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे. ताज्या बातम्या, घडामोडी आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे अपडेट्स येथे मिळवा.

Similar Channels

Swipe to see more

Posts

CMO Maharashtra
CMO Maharashtra
3/1/2025, 10:59:22 AM

📸 Group Photo! A group photo of CM Devendra Fadnavis with senior police officers of Maharashtra at the 'Senior Police Officers’ Conference-2025'. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 'वरिष्ठ पोलीस अधिकारी परिषद-2025' मध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत छायाचित्र.

Post image
👍 🙏 ❤️ 😂 😢 66
Image
CMO Maharashtra
CMO Maharashtra
3/1/2025, 10:56:04 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'वरिष्ठ पोलीस अधिकारी परिषद-2025' मध्ये पोलीस नियमावलीच्या (मॅन्युअल) दोन खंडांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, राज्याच्या मुख्य सचिव, पोलीस महासंचालक व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. https://x.com/CMOMaharashtra/status/1895789469674193087?t=qzRrHBSjqVVon5RupfP6Lw&s=19

🙏 👍 ❤️ 18
CMO Maharashtra
CMO Maharashtra
3/1/2025, 10:55:06 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'वरिष्ठ पोलीस अधिकारी परिषद-2025' मध्ये अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) डॉ. निखिल गुप्ता लिखित 'डिपार्टमेंटल एन्क्वायरी' या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, राज्याच्या मुख्य सचिव, गृह विभागाचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. https://x.com/CMOMaharashtra/status/1895788329800778131?t=xLzC7dWT9Yyv0L9aNZu3aA&s=19

🙏 👍 ❤️ 18
CMO Maharashtra
CMO Maharashtra
2/28/2025, 1:55:29 PM

🔴 🎥 *| CMO MAHARASHTRA LIVE |* 📍 *नागपूर* 🗓️ २८-०२-२०२५ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा २०२५' चे उद्घाटन* ▶️ *YouTube* https://www.youtube.com/live/-XEI2u-defs?si=aKx4vrDDblTFrBx4

👍 🙏 ❤️ 😂 55
CMO Maharashtra
CMO Maharashtra
2/28/2025, 2:35:21 PM

https://x.com/CMOMaharashtra/status/1895471470907977969?t=WnSSBLyUsCdCQSSskMduWA&s=19

🙏 👍 ❤️ 😢 25
CMO Maharashtra
CMO Maharashtra
2/28/2025, 2:39:41 PM

🔴 🎥 *| CMO MAHARASHTRA LIVE |* 📍 *नागपूर* 🗓️ २८-०२-२०२५ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा २०२५' चे उद्घाटन* ▶️ *YouTube* https://www.youtube.com/live/-XEI2u-defs?si=aKx4vrDDblTFrBx4 *𝕏* / *Twitter* https://x.com/CMOMaharashtra/status/1895483532300231131?t=JaZwc8jMc_n0HRm36BG3Tw&s=19 *Facebook* https://www.facebook.com/share/v/18w7RdhMPf/

🙏 ❤️ 👍 😢 39
CMO Maharashtra
CMO Maharashtra
2/28/2025, 3:15:25 PM

CM Devendra Fadnavis unveiled the report 'MumBAI 2035: India’s Hub of Adoption and Profitable Innovation', prepared by McKinsey in collaboration with TEAM, outlining a visionary roadmap for the city's growth and innovation-driven future. During this, Minister Mangal Prabhat Lodha and Minister Adv Ashish Shelar were present. https://x.com/CMOMaharashtra/status/1895492442876788826?t=dMitc5fCjtBRoV6hwXUQcg&s=19

👍 ❤️ 🙏 😢 52
CMO Maharashtra
CMO Maharashtra
2/28/2025, 11:02:11 AM

*व्हॉट्सअँप सेवेच्या माध्यमातून "आपले सरकार"च्या ५०० सेवा मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* *मुंबई टेक वीक २०२५ चे उद्घाटन, व्हॉट्सॲप चॅटबॉट, भूखंड प्रदान, उद्योजक संग्रहालय, ए.आय.हब संदर्भातही घोषणा* मुंबई, दि.28 : महाराष्ट्रात आता शासन सेवा अधिक सुलभ आणि लोकाभिमुख करण्यासाठी मेटा प्लॅटफॉर्मच्या मदतीने "आपले सरकार" पोर्टलवरील ५०० हून अधिक सेवा थेट व्हॉट्सअँपवर उपलब्ध होणार आहेत. राज्यात मोबाईल फोनचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला आहे. आतापर्यंत ऑनलाइन सेवा उपलब्ध असूनही काही नागरिक ऑनलाइन प्रक्रियांपासून दूर राहायचे. मात्र, व्हॉट्सॲपचा सहज आणि सर्वदूर वापर पाहता, आता शासनाच्या महत्त्वाच्या सेवांचा लाभ थेट व्हॉट्सअँपद्वारे घेता येणार आहे. या नव्या सुविधेमुळे महाराष्ट्रात 'व्हॉट्सअँप गव्हर्नन्स' चा नवा अध्याय सुरू होत आहे. या नव्या योजनेमुळे नागरिकांना अधिक सोयीस्कर आणि वेगवान सेवा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत आज आपले सरकार व्हॉट्सअँप चॅटबॉट संदर्भात माहिती तंत्रज्ञान विभाग आणि मेटा यांच्यात बीकेसी येथे सामंजस्य करार झाला. त्याचबरोबर एम.एम.आर.डी.ए. आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. एम.एम.आर.डी.ए. ने एन.पी.सी.आय. ला मुंबईतील बीकेसी येथे त्यांच्या जागतिक मुख्यालयाच्या उभारणीसाठी भूखंड प्रदान केला. तसेच कौशल, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आणि TEAM सोबत नॉलेज AI हब संदर्भात सामंजस्य करार झाला. त्याचबरोबर उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजक संग्रहालयाची स्थापना केली जाणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. मुंबई टेक वीक २०२५ चा आज शुभारंभ झाला. या उद्घाटन प्रसंगी लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जियो कन्वेंशन सेंटर येथे मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचे भविष्यातील रोडमॅप आणि राज्य सरकारच्या तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्र शासनाच्या धोरणांमुळे राज्य हे देशाच्या स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर आहे. जेव्हा आपण ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहतो, तेव्हा तंत्रज्ञान हा विकासाचा मुख्य आधारस्तंभ असतो. फिनटेक आणि एआय क्षेत्रातील स्टार्टअप्सला गती देण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वॉर रूममुळे प्रकल्पांच्या निर्णय प्रक्रियेला वेग मिळला आहे. पूर्वी मुंबईत एखादा प्रकल्प सुरू करण्यासाठी १८ विविध सरकारी यंत्रणांची परवानगी घ्यावी लागायची, त्यामुळे प्रकल्पांना विलंब होत असे. वॉर रूमच्या माध्यमातून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी एकत्र आणले आणि त्वरित निर्णय घेण्यास सुरुवात केली. याच कारणामुळे मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू यासारख्या प्रकल्पांना गती मिळाली, असे श्री.फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र सरकार तीन मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रीत करणार आहे. यात वाढवण बंदर हा प्रकल्प मुंबईच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडविणारा आहे. हा पोर्ट सध्याच्या जे.एन.पी.टी. पेक्षा तीनपट मोठा असून, २० मीटर खोल बंदर असल्यामुळे जगातील सर्वात मोठी जहाजे येथे थांबू शकतील. भारताला जागतिक सागरी व्यापारात महत्त्वाचे स्थान मिळवून देणारा हा बंदर प्रकल्प असेल. त्याच बरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व नव्या स्मार्ट सिटीची उभारणीवर लक्ष केंद्रित करणार आहे. हे विमानतळ पूर्ण झाल्यावर आजूबाजूला एक नवीन व्यापारी आणि तंत्रज्ञान केंद्र विकसित केले जाणार आहे. ही नवी शहरे मुंबईच्या तुलनेत तीनपट मोठी असतील आणि उद्योगांसाठी उत्तम संधी उपलब्ध करतील, असेही त्यांनी सांगितले. तसेच नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा आणि गोदावरी जलप्रकल्प हाती घेतले जात आहेत. या प्रकल्पांमुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा होईल आणि शेती उत्पादन वाढणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केले. राज्यातील सायबर सुरक्षा उपाययोजना संदर्भात उत्तर देताना श्री.फडणवीस म्हणाले की, आज जगभरातील गुन्हेगारी सायबर जगतात शिफ्ट होत आहे. भविष्यात ७०% गुन्हे हे सायबर गुन्हे असतील. त्यामुळे नवी मुंबईत भारतातील सर्वात आधुनिक सायबर सुरक्षा केंद्र उभारले आहे. सर्व बँका, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यांना या यंत्रणेशी जोडले असल्याने आता कोणत्याही आर्थिक फसवणुकीवर तत्काळ कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, २००० ते २०१४ दरम्यान महाराष्ट्रात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गुंतवणूक कमी झाल्यामुळे अनेक आयटी कंपन्या बंगळुरू आणि हैदराबादकडे वळल्या. मात्र, अटल सेतूसारख्या प्रकल्पांमुळे नवी मुंबई आता एक नवे तंत्रज्ञान केंद्र बनत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईच्या भविष्यातील विकास आराखड्यावर भाष्य करताना श्री.फडणवीस यांनी सांगितले की, आजच्या मुंबईत व्यावसायिक जागांची कमतरता असल्यामुळे नवी मुंबई, नवीन ठाणे आणि वाढवण येथे नवीन शहरे उभारली जाणार आहे. त्यामुळे उद्योगांना अधिक जागा उपलब्ध होईल आणि मुंबईतील दडपण कमी होईल, असेही ते म्हणाले.

👍 🙏 ❤️ 😂 😢 😮 136
CMO Maharashtra
CMO Maharashtra
2/28/2025, 10:58:55 AM
Post image
🙏 👍 ❤️ 😂 22
Image
CMO Maharashtra
CMO Maharashtra
2/28/2025, 4:58:16 PM

*CMO Maharashtra Tweets:* CM Devendra Fadnavis witnessed the exchange of 2 MoUs between MSInS, Government of Maharashtra, and the Tech Entrepreneurs Association of Mumbai (TEAM) for: 🤝Development of Innovation City 🤝AI initiatives in governance CM Devendra Fadnavis will be leading the development of Innovation City as a world-class model. The key areas of collaboration under both MoUs are: 📝Policy Support 📝Startup Incubation & Support 📝AI For Governance 📝Mentorship Support These MoUs will pave the way for innovation-driven growth, making Maharashtra a leader in technology and AI-driven governance. Minister Mangal Prabhat Lodha and Minister Adv Ashish Shelar were present too.

🙏 ❤️ 👍 😢 25
Video
Link copied to clipboard!