Saral Update And Udise+ NLP New Bharat Sakshar And Education News Update
644 subscribers
About Saral Update And Udise+ NLP New Bharat Sakshar And Education News Update
Educational News GR All Government Schemes National Scholarship Udise Pulse Shalarth,NLP,FLN,DA.ect ....
Similar Channels
Swipe to see more
Posts

मा. उपसंचालक , श्रीमती माधुरी सावरकर मॅडम , सेवा पूर्व विभाग SCERT पुणे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाला उद्या दिनांक 7/ 6/ 2025 रोजी ईद निमित्त सुट्टी राहील. परवा दिनांक 8/ 6/ 2025 पासून वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नियमित वेळापत्रकानुसार सुरू राहील. दिनांक 8/ 6 /2025 रोजी सकाळी 9:30 वाजले नंतर उपस्थिती नोंदविली जाणार नाही. करिता सर्व प्रशिक्षणार्थींनी 9:30 पूर्वी उपस्थित राहावे. प्रशिक्षण केंद्र समन्वयक

_बदली पोर्टलवर सद्यस्थितीत संवर्ग एक साठी होकार नकार व संवर्ग दोन साठी बदली कोण मागणार आहे हे कळवण्यासाठी वेळापत्रक दिसत आहे परंतु प्रत्यक्षात तिथे अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला नाही._ _त्यामुळे आपल्या जिल्हा परिषदेकडून अधिकृत सूचना किंवा पत्र आल्यानंतरच आपल्याला पोर्टलवर अर्ज भरता येईल._ पोर्टल लिंक 👇 https://ott.mahardd.com/

📌 दिनांक : ५ जून २०२५ इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये पहिल्या फेरीसाठी अर्ज भरण्यासाठी २६/०५/२०२५ ते ०५/०६/२०२५ हा कालावधी विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. या कालावधीमध्ये दि. ०५ जून २०२५ पर्यंत ११,२९,९२४ विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म पूर्ण (भाग १ व भाग २ ) भरले आहेत. या दरम्यान विद्यार्थ्यांना खालील दोन प्रकारचे प्रश्न पडल्याचे दिसून येते. त्याबाबत स्पष्टीकरण. 1. ज्या विद्यार्थ्यांनी सदर प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी करून प्रवेश अर्जाचा भाग १ लॉक केला आहे तथापि भाग २ अद्याप भरणे बाकी आहे, किंवा लॉक करणे बाकी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी *दिनांक ६ जून २०२५ रोजी दुपारी १२:१५ ते ७ जून २०२५ दुपारी १२:३० वा* या कालावधीत आपल्या अर्जाचा भाग २ भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तरी संबंधित विद्यार्थ्यांनी आपला पसंतीक्रम अर्ज भाग २ दिलेल्या वेळेत लॉक करावा. अशा अशा विद्यार्थ्यांनी भाग २ भरून लॉक न केल्यास त्यांना प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट साठी व पहिल्या फेरीत प्रवेशासाठी उच्च माध्यमिक विद्यालय देण्यासाठी ग्राह्य धरले जाणार नाही याची नोंद घ्यावी. यापूर्वी भाग २ लॉक केलेल्या विद्यार्थ्यांना आपले पसंती क्रम बदलण्याची सुविधा यादरम्यान मिळणार नाही. 2. ज्या विद्यार्थ्यांनी दि. ०५ जून २०२५ पर्यंत ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणी केलेली नाही किंवा आपला प्रवेश अर्ज भाग १ भरलेला नाही अथवा प्रवेश अर्ज अर्धवट भरला आहे व विहित मुदतीत आपला अर्जाचा भाग १ पूर्ण करू शकले नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी *प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला नव्याने प्रवेश अर्जाचा भाग १ व भाग २ भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.* त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी पुढील फेरीच्या वेळी आपले अर्ज वेळेत भरून लॉक करावेत. प्रत्येक फेरीपूर्वी नवीन विद्यार्थ्यांनाही आपला अर्ज भरण्याची सुविधा मिळणार आहे. यासाठी प्रवेश फेरीच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करण्याची दक्षता घ्यावी. प्रवेश प्रक्रियेचे पोर्टल : https://mahafyjcadmissions.in इयत्ता. ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण संचालनालय ( माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांच्या तर्फे सुरू करण्यात आलेले अधिकृत व्हॉट्स अप चॅनेल https://whatsapp.com/channel/0029VbB2T6DBA1etTOdyi10C या चॅनेल वर आपल्याला सर्व अपडेट दिले जातील. - शिक्षण संचालनालय, ( माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे

मोबाईलवर फॉर्म भरण्याची प्रक्रिया: 1. लिंक: https://ott.mahardd.com/ 2. मोबाईल नंबर टाका, OTP ने लॉगिन करा. 3. भाषा मराठी निवडा. 4. डाव्या कोपऱ्यातील तीन रेषांवर क्लिक → जिल्हाअतंर्गत → अर्ज. 5. संवर्ग 1 किंवा 2 टॅब निवडा. संवर्ग 1 फॉर्म: - Disclaimer (अवघड क्षेत्र राऊंड) ला ✅ टिक. - नाव, शालार्थ ID, U-DISE तपासा. - बदलीतून सूट? Yes (नको) किंवा No (हवी). - प्रकार: Self (1-14) किंवा Spouse (15-20). - माहिती तपासून Submit, OTP टाका. संवर्ग 2 फॉर्म: - Disclaimer (30 किमी दाखला अनिवार्य) ला ✅ टिक. - जोडीदाराचे अंतर (30+ किमी) नोंदवा. - प्राधान्यक्रम (1-7): - प्राधान्य 1: दोघेही जिल्हा परिषद शिक्षक → Primary → जोडीदाराचा शालार्थ ID/मोबाईल. - प्राधान्य 2-7: जोडीदार इतर विभाग → माहिती टाका. - माहिती तपासून Submit, OTP टाका. टीप: - सध्या शाळा निवडायच्या नाहीत, फक्त संवर्ग 1/2 व उपप्रकार नोंदवा. - OTP टाकून Submit केल्याशिवाय पर्याय ग्राह्य नाहीत. - अनावधानाने Withdraw करू नये. - फॉर्म डाउनलोड किंवा Withdraw करू शकता. अधिक माहितीसाठी व्हिडिओ : https://youtu.be/E_izabgHAkc?si=AUhqOlhMAsQLjzLe

📌 दिनांक : ५ जून २०२५ इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये पहिल्या फेरीसाठी अर्ज भरण्यासाठी २६/०५/२०२५ ते ०५/०६/२०२५ हा कालावधी विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. या कालावधीमध्ये दि. ०५ जून २०२५ पर्यंत ११,२९,९२४ विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म पूर्ण (भाग १ व भाग २ ) भरले आहेत. या दरम्यान विद्यार्थ्यांना खालील दोन प्रकारचे प्रश्न पडल्याचे दिसून येते. त्याबाबत स्पष्टीकरण. 1. ज्या विद्यार्थ्यांनी सदर प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी करून प्रवेश अर्जाचा भाग १ लॉक केला आहे तथापि भाग २ अद्याप भरणे बाकी आहे, किंवा लॉक करणे बाकी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी *दिनांक ६ जून २०२५ रोजी दुपारी १२:१५ ते ७ जून २०२५ दुपारी १२:३० वा* या कालावधीत आपल्या अर्जाचा भाग २ भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तरी संबंधित विद्यार्थ्यांनी आपला पसंतीक्रम अर्ज भाग २ दिलेल्या वेळेत लॉक करावा. अशा अशा विद्यार्थ्यांनी भाग २ भरून लॉक न केल्यास त्यांना प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट साठी व पहिल्या फेरीत प्रवेशासाठी उच्च माध्यमिक विद्यालय देण्यासाठी ग्राह्य धरले जाणार नाही याची नोंद घ्यावी. यापूर्वी भाग २ लॉक केलेल्या विद्यार्थ्यांना आपले पसंती क्रम बदलण्याची सुविधा यादरम्यान मिळणार नाही. 2. ज्या विद्यार्थ्यांनी दि. ०५ जून २०२५ पर्यंत ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणी केलेली नाही किंवा आपला प्रवेश अर्ज भाग १ भरलेला नाही अथवा प्रवेश अर्ज अर्धवट भरला आहे व विहित मुदतीत आपला अर्जाचा भाग १ पूर्ण करू शकले नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी *प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला नव्याने प्रवेश अर्जाचा भाग १ व भाग २ भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.* त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी पुढील फेरीच्या वेळी आपले अर्ज वेळेत भरून लॉक करावेत. प्रत्येक फेरीपूर्वी नवीन विद्यार्थ्यांनाही आपला अर्ज भरण्याची सुविधा मिळणार आहे. यासाठी प्रवेश फेरीच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करण्याची दक्षता घ्यावी. प्रवेश प्रक्रियेचे पोर्टल : https://mahafyjcadmissions.in इयत्ता. ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण संचालनालय ( माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांच्या तर्फे सुरू करण्यात आलेले अधिकृत व्हॉट्स अप चॅनेल https://whatsapp.com/channel/0029VbB2T6DBA1etTOdyi10C या चॅनेल वर आपल्याला सर्व अपडेट दिले जातील. - शिक्षण संचालनालय, ( माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे

*MHT CET Result Declaration Date 16 June 2025*