आपलं मानसशास्त्र
आपलं मानसशास्त्र
February 7, 2025 at 03:11 PM
अति विचारांचा परिणाम आपल्या डोळ्यांवर सुद्धा होतो. अति विचार (Overthinking) केल्यामुळे मानसिक तणाव वाढतो, आणि त्याचा परिणाम फक्त मनावरच नव्हे तर डोळ्यांच्या आरोग्यावरही होतो. संशोधनानुसार, जास्त चिंता किंवा मानसिक तणाव असताना मेंदूतून कॉर्टिसोल (Cortisol) नावाचे ताण निर्माण करणारे हार्मोन स्रवते, जे डोळ्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकते. अति विचारांमुळे होणारे डोळ्यांचे त्रास: सतत चिंता केल्याने डोळ्यांच्या स्नायूंवर ताण येतो. डोळे कोरडे पडते. मानसिक तणावामुळे अश्रू ग्रंथींचे कार्य प्रभावित होते. दृष्टी धूसर होते. सतत विचार करण्यामुळे झोप कमी होते, ज्याचा थेट परिणाम डोळ्यांवर होतो. अशा समस्यांपासून बचाव करण्यासाठी माइंडफुलनेस मेडिटेशन, योगासने आणि योग्य झोप अत्यंत महत्त्वाची आहे. मानसिक आरोग्य सुधारल्यास डोळ्यांचे आरोग्यही चांगले राहते. राकेश वरपे | मानसशास्त्र तज्ज्ञ #overthinking #mentalhealthawareness #rakeshvarpe #आपलंमानसशास्त्र
👍 ❤️ 💯 🙏 12

Comments