
छत्रपती_शिवाजी_महाराज_🚩. शिवरायांचे_वारकरी.🚩
7.5K subscribers
About छत्रपती_शिवाजी_महाराज_🚩. शिवरायांचे_वारकरी.🚩
" काहीजण म्हणतात शाळेत इतिहास चार पानात शिकवला जातो " या वास्तविकतेला छेद देत आपलेही छत्रपतींप्रति एक कर्तव्य म्हणून ' आपण इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत कसा पोहचवू शकतो' या संकल्पनेला प्रत्यक्ष उतरवत आम्ही गेले कित्येक वर्ष छत्रपतींचा इतिहास घराघरात पोहचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत ! आपली प्रेमळ साथ लाभेल हीच खात्री 🤝 सध्या समाज माध्यमात वाईट गोष्टींना समर्थन करणाऱ्या तरुणांची संख्या झपाटयाने वाढत आहे त्यामुळे अशा या कलियुगी जगात आपण मात्र चांगल्या गोष्टींना सहकार्य केलं तर त्या टिकतील आणि अभिमानाने share सुद्धा केल्या जातील त्यामुळे तुमच्या हक्काचं चॅनेल नक्की follow करा 💯 इतरांनाही कळवा❤️ दैनंदिन शिवदिनविशेष.... ऐतिहासिक माहिती... इतिहासावर आधारित प्रश्नावली... महाराजांचे विचार .... *ऐतिहासिक पुस्तकांच्या pdf...* ही सर्व शिवकालीन माहिती भेटेल ! आपला इतिहास आपला अभिमान😎 जग कर्तव्य विसरेल ! निष्ठा विसरेल ! आपण नाही विसरायचं💯 शिवभक्त म्हणजे - रक्ताची नाती नसताना जे शिवराय या नावाखाली एकत्र येतात त्यांना शिवभक्त म्हणतात🙏 *अरे तुमचं आमचं नातं काय !* *जय जिजाऊ जय शिवराय❤️*
Similar Channels
Swipe to see more
Posts

*आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष 📜* 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ मार्च १५७२* प्रतापसिंह महाराणा झाला ! प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापास १ मार्च १५७२ रोजी महाराणा केले. तो महाराणा झाला त्यावेळी राजधानी चितोड शत्रूच्या हातात गेली होती. अनेक राजपूत अधिपतींनी अकबराचे स्वामित्व पतकरले होते व काहींनी आपल्या मुली त्यास देऊन शरीरसंबंध जोडला होता; पण राणाप्रतापने त्याच्यापुढे मान लवविली नाही. त्याने चितोड अकबराच्या हातून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि आपले वास्तव्य अकबराच्या सैन्याच्या दृष्टिक्षेपापासून दूर ठिकाणी केले. प्रजेला अरवलीच्या डोंगराळ भागात, जेथे अकबराचा उपद्रव पोहोचणार नाही, अशा ठिकाणी वस्ती करण्यास लावले. तेथेच त्याने काही भागात शेती केली. मेवाडचा मैदानी प्रदेश ओसाड करून टाकला आणि आपली राजधानी गोगुंड येथे नेली. सर्व डोंगरभागांतून अभेद्य असे किल्ले बांधले व ते शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ मार्च १६३०* शाहजहान बऱ्हाणपूरला पोहोचला. इथे रावरतनच्या हाताखाली दहा हजारांचे दळ बनवले. वाशीमची बाजू धरून ठेवणे व तेलंगाण नियंत्रणाखाली आणणे ही दोन उद्दिष्टे त्यांना दिली होती. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ मार्च १६३३* निजामशाही बुडविण्यासाठी खुद्द शहाजहान दक्षिणेत उतरला होता. त्यासाठी महाबतखान आणि त्याचा मुलगा खानजमान दौलताबाद किल्यावर चालून आले. शहाजहान या मोहिमेवर असताना मुमताजमहलचा बुऱ्हाणपूरला मृत्यू झाल्याने तो तिकडे गेला. १ मार्च १६३३ रोजी महाबतखानाने निजामशहाची राजधानी असलेल्या दौलताबाद किल्ल्याला वेढा दिला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ मार्च १६५९* कोकणातील सावंत आणि भोसले यांच्याबरोबर छत्रपती शिवरायांचा करार झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ मार्च १७७९* बारभाई कारस्थान - पुरंदरचा तह उत्तर पेशवाईत रघुनाथरावाने अन्यायाने पेशवेपद मिळविण्यासाठी केलेला प्रयत्न अयश्स्वी करणाऱ्या मराठी सेनानी व मुत्सद्दी यांचा संघ उभा राहिला होता. नारायणरावाच्या वधानंतर पेशवाई मिळविण्यासाठी रघुनाथरावाने केलेल्या कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी प्रामुख्याने हा स्थापन झाला. बारभाई म्हणजे बारा माणसांचे मंडळ असे नसून काही एका हेतूने एकत्र जमलेला समूह होता. बारभाई मंडळ स्थापन झाले, "रघुनाथरावाला काढून टाकू नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हिच्या नावाने कारभार करावा; तिला मुलगा झाला तर त्यास, नाही तर दत्तक घेऊन त्याच्या नावाने कारभार करावा, असे सुरुवातीस कारस्थान ठरले." यालाच बारभाई कारस्थान म्हणतात. ह्यातच सखाराम बापू व नाना फडणीस हे कारभारी आणि त्रिंबकराव पेठे यांच्याकडे फौजेचे प्रमुख म्हणून ठेवावे असे ठरले हो. पार्वतीबाई आणि गंगाबाई यांना मारण्याचा कट उघडकीस येताच सखारामबापू नाना फडणीस, हरिपंत फडके यांनी गंगाबाईला पुण्याहून १७ जानेवारी १७७४ रोजी पुरदंरच्या किल्ल्यावर नेले आणि तिच्या नावाने कारभार सुरू केला. त्यामुळे रघुनाथराव व बारभाई संघ असे उघड राजकारण सुरू झाले. यातूनच २६ मार्च १७७४ रोजी कासेगावची लढाई झाली. या लढाईत त्रिंबकराव पेठे मरण पावले आणि रघुनाथरावाला बऱ्हाणपूरकडे जाण्यास संधी मिळाली. १८ एप्रिल १७७४ रोजी गंगाबाईला मुलगा झाला. त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात येऊन १८ मे १७७४ रोजी त्याला पेशवाईची वस्त्रे देण्यात आली. यानंतर बारभाईत मोरोबादादा फडणीस, भगवानराव प्रतिनिधी, बाबूजी नाईक, परशुरामभाऊ पटवर्धन, भोसले इ. मंडळींचा समावेश करण्यात आला. रघुनाथराव आणि बारभाई यांच्यात बरेच वर्षे संघर्ष चालू होता. रघुनाथरावाने इंग्रजांशी तह करून त्यांचा आश्रय घेतला. रघुनाथरावाला ताब्यात घेण्यासाठी बारभाईनी इंग्रजांशी १ मार्च १७७९ रोजी पुरंदरचा तह केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://whatsapp.com/channel/0029Va4rMrLKWEKxssvJBb0r *जय शहाजीराजे, जय जिजाऊ* *जय शिवराय, जय शंभूराजे* *जय हिंद, जय महाराष्ट्र 🚩*

👰♀️🕺 *''विवाह'' हा शब्द आनंदाचा न राहता डोकेदुखीचा विषय झाला आहे.* मुलाचा फोटो, संस्कार नंतर ,त्याचा पगार किती? ते आधी बोला, अशी परिस्थिती सध्या आहे. मुलाचे आईवडील आपल्या मुलासाठी स्थळ शोधणार तरी कसे? कारण मुलींचे ढीगभर पगार आणि अवाजवी अपेक्षा यामुळे ते हताश झाले आहेत . मुलींचे पगार भरमसाट अर्थात कर्तृत्त्वाने मिळवलेले ( पण तेच आज लग्नाचा मोठा अडथळा होऊ पाहत आहेत ) आणि आणि मला १० लाख पगार, मग मला २० लाख पगार असलेला मुलगा हवा किंवा त्या पेक्षा अधिक पगार असलेला मुलगा हवा ही अपेक्षा! संसार ह्या शब्दाचा अर्थच कुठेतरी हरवत चालला आहे . आधीचे ते कांदेपोहे बरे म्हणायची वेळ आली आहे. अरे काय चाललंय काय ? भानावर या लवकर, नाहीतर त्या २० लाखांच्या नोटांशी विवाह करावा लागेल. पैशावर प्रेम केलेत तर पैसा मिळत राहील, सुख सुविधा मिळतील, पण नवर्याचे प्रेम मिळणार नाही. कारण हाच पैसा मिळवायला स्वतःचे सो कॉल्ड स्टेट्स जपायला तो घाण्याला जुंपलेल्या बैलासारखा कॉम्पुटर घेऊन काम करत राहील आणि जगणे व पर्यायाने सहजीवनाचा आनंद गमावून बसेल. पालकांनीही भानावर या, नाहीतर मुलांचे /मुलींचे विवाह आपल्या उभ्या हयातीत पाहायला मिळणार नाहीत. हे ऐकायला आणि वाचायला त्रासदायक आहे पण त्रिवार सत्य आहे आणि हे चित्र आपणच बदलू शकतो . एक मुलगी, तिला पगार ३ लाख आणि नवरा हवा १० लाख पगाराचा. तिला मी म्हटले, अगं तुला आणला तुझ्या मनासारखा १० लाखाचा बाहुला, पण तो स्वीकारेल का तुला? तो म्हणेल मला हवी १० लाखाची बाहुली त्याचे काय करणार आपण ? आपण काय आहोत आणि काय अपेक्षा करत आहोत ह्याचा कुठेही ताळमेळ नाही . एकतर मुलगा पुण्यातील हवा नाहीतर थेट अमेरिक .अग्गोबाई ? मध्ये काही पर्याय नाही की काय? मध्ये काय सगळी वाळवंट आहेत की काय? आपण स्वतः सदाशिव पेठेतून बाहेर आलो नाही आणि जायचे ते थेट अमेरिका? असो! माणूस पैसा मिळवायच्या मागे लागला कारण ऐहिक सुखासाठी तो आवश्यक आहे, अगदी मान्य! पण, जेव्हा पैसा हाच विवाह ठरण्याचा निकष ठरतो तेव्हा गणिते बदलत जातात . माझ्या वर प्रेम करणारा , मला माणूस म्हणून समजून घेणारा , माझ्या आवडी निवडी, माझे छंद ह्यांना प्रोत्साहन देणारा नवरा हवा असे एखाद्या तरी मुलीने म्हणावे. सतत पैशाचा चष्मा लावून बसलात, तर असंख्य आनंदाच्या क्षणांना मुकाल आणि भानावर याल तेव्हा वेळ नुघून गेलेली असेल. मुलीला १० लाख पगार म्हणून त्याही पेक्षा कमी पगार असणारी स्थळे नाकारायची, मग उरणार काय ओंजळीत? सगळंच वाहून जाईल. मुळात पैसा हा विवाहाचा निकष हे समीकरण न पटणारे आहे . स्त्रियांना शिकवले, त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी! त्यांना आचार विचारांनी स्वावलंबी केले हे चुकले की काय पालकांचे ? नाही, काहीच चुकले नाही; पण चुकत आहे ते ह्या गोष्टीना अवास्तव महत्त्व दिल्यामुळे! मुलींची वय सुद्धा ३५ शी ओलांडत आहेत . मला ८ लाख पगार आहे आणि मुलालाही तितकाच किंवा अगदी एखादा लाखभर कमी असला तरी चालेल. दोघांचे होतात की १५-१६ लाख... त्यात संसार सुखाचा नक्कीच होईल . आपल्या आईवडिलांनी नाही का केला? त्यांना कुठे होते लाखांनी पगार . पण त्यांचा विवाह संस्था , सहजीवन ह्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा होता. आज त्यांचाच तो सहजीवनाचा आनंद देणारा चष्मा पुन्हा एकदा डोळ्यांना लावायची नितांत गरज आहे. पुढे जाऊन आता पालकांनी सुद्धा आपली धोरणे थोडी बाजूला ठेवून मुलामुलींशी बोलले पाहिजे , आजकालची मुले हुशार आहेत त्यांना फक्त एक वेगळा संसाराचा आरसा दाखवण्याची गरज आहे. भौतिक सुखे हवी, त्यासाठी लागणारा पैसाही हवा, पण मिळवलेला पैसा उपभोगायला आपणही घरात हवे. काय होतंय, पैसा हाच निकष प्राथमिक किंबहुना तो एकमेव निकष झाल्यामुळे मुलींची स्थळे शोधताना गुण ,पत्रिका गोत्र सर्व व्यवस्थित असेल तरी पगारावर सर्व गाड्या येऊन थांबतात. पुढे कसे जायचे? माझ्या मते अनेक स्थळांच्या बाबतीत बघण्याचे कार्यक्रम, भेटी गाठी सुद्धा होत नाहीत; कारण मुलीचा पगार अधिक त्यामुळे पुढचे सर्व थांबते. अनेकांना हे अनुभव येत असतील. आपली विचारसरणी बदलायची वेळ आता आली आहे , आपले अहंकार ( जे आपल्याला आयुष्यभर एकटे ठेवू शकतात ) ते वेळीच आटोक्यात आणण्याची गरज आहे. दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे. एकदा वेळ निघून गेली की गेली, मग कितीही अक्कल आली तरी उपयोग नाही . मुळात विवाह हा एक आनंद सोहळा आहे. आईवडिलांसाठी आपल्या मुलांच्या डोक्यावर अक्षता पडणे ह्यासारखे सुख दुसरे असूच शकत नाही . ज्याच्यासाठी आयुष्यभर कष्ट केले , वेळप्रसंगी पोटाला चिमटा काढून मुलांच्या गरजा त्यांची शिक्षणं केली, ती त्यांचा सुखाचा संसार पाहायला मिळावा ही एकमेव इच्छा उराशी असलेले पालक आज हतबल झाले आहेत . विवाह म्हणजे सुखाची देवाण घेवाण , दोन जीवांचे मिलन तेही आयुष्यभरासाठी , दोन कुटुंबांचे एकत्र येणे ह्यात पैशाची गणिते आलीच कुठून ? सगळेच राजकुमार परीकथेतील नाहीत. सगळेच आलिशान गाडीतून येणार नाहीत , जो तुमचे मन जिंकून संसार सुखाचा करेल तोच तुमचा खरा खुरा राजकुमार असेल आणि तोच तुमचा सुयोग्य सहचर सुद्धा! आज हा लेख वाचून निदान एका मुलीने किंवा मुलाने आपल्याला आलेल्या स्थळांचा पुनर्विचार केला आणि आपला जोडीदार शोधला तर त्यासारखा आनंद माझ्यासाठी दुसरा नसेल .तो आनंद सगळ्यांच्या ओंजळीत येण्याची आस धरून आहोत. विचार बदला , आपल्या आवडी निवडी बदला! मला विवाह का करायचा आहे ? ह्याचे सर्व आराखडे पुन्हा एकदा कागदावर मांडा , चुकलेली गणिते पुन्हा सुधारा , पुन्हा मांडा . हाती लागेल तो फक्त आनंद हे नक्की! पैसा हीच विवाहाची इतिपुर्तता नाही तो आयुष्यभर मिळवायचाच आहे, पण आज जाणारे वय पुन्हा मिळणार नाही ते मात्र मागे फिरवता येणार नाही . संसार सहजीवन ह्याची खरी व्याख्या म्हणजे एकमेकांची सोबत , सहवास असणे ही आहे. पैशाच्या तराजून विवाह तोलण्याची गल्लत आपण करत आहोत . पैसा पैसा करत अनेक उत्तमातील उत्तम स्थळे हातातून निसटून जात आहेत. वास्तवात कधी जगणार आहोत आपण ? सगळे सगळे दूर ठेवून वास्तव स्वीकारण्याची गरज आहे आणि तसे झाले, तर येत्या लग्न सराईत अनेक आई बाबा सासू सासरे झालेले पाहायला मिळतील. विचार करण्यासारखी गोष्ट आहे.. बघा पटत का? सुंदर लेख ! या संदर्भात आम्हाला आलेल्या अनुभवांवरुन काही मुद्दे पुढे मांडत आहे..... १) मुलाच्या अथवा मुलीच्या आणि त्यांच्या पालकांच्या अपेक्षा काय आणि किती असाव्यात हा सर्वस्वी व्यक्तिगत प्रश्न आहे.त्यावर काहीही म्हणणे नाही.पण किमानपक्षी समोरच्या स्थळाला तसे कळविणे एवढेही सौजन्य हल्ली दाखविले जात नाही याचे वैषम्य वाटते ! २) चांगल्या शिकलेल्या मुली — एकतर त्यांची किंवा त्यांच्या आईची/वडिलांची/तिघांचीही अशी अपेक्षा असते की मुलगा Well Settled हवा ! आपल्याएवढाच किंवा काही अंतर असलेला मुलगा , त्याची स्वत:ची जागा ( तीही मोठी — जिथे रहात असेल तिथे ! ) हवी !कुठलीही मुलगी अथवा पालक असं म्हणताना आढळले नाहीत की *मुली , तूही शिकली आहेस , चांगली नोकरी करत्येयस , दोघे मिळून छान संसार करा , हळूहळू मोठी जागा घ्या हवी तशी , घर सजवा मनाप्रमाणे , सासू सासरे दीर जाऊ असे एकत्र रहा ! आयुष्यात पैसा परत मिळवता येतो—माणसं परत मिळवता येत नाहीत! म्हणून माणसं ही जपायची असतात आणि पैसा वापरायचा असतो!* याउलट हल्ली माणसं वापरायचे आणि पैसा जपायचे सल्ले सर्रास दिले जातात ! ३) अवास्तव अपेक्षा , आणि सर्वगुणसंपन्न वराचा शोध — यामागे लागून , *अजून चांगलं स्थळ मिळेल!* या हव्यासापाई मुली *घोडनवर्या* होत आहेत आणि याला अवास्तव अपेक्षा कारणीभूत नाहीत का ? ४) एकिकडे वयं वाढली की मुलींच्या गर्भधारणेची वयं उलटून गेल्यामुळे समस्या निर्माण होतात आणि म्हणून मुलांना व मुलींना बोलावं तर हल्ली *आम्हाला मूलच नकोय!* चा घोषा ! म्हणजे एकिकडे अल्पसंख्यांक अतिसंख्यांक होण्यासाठी वाढत चाललेले असताना आपण कमी होत चाललोय आणि *मला काय त्याचे?* ही हिंदूंची वृत्ती संपतच नाही ? अनेक थोर संघटक म्हणाले होते *या देशात हिंदूंना सगळ्यात मोठा धोका हिंदूंपासूनंच आहे!* हे किती द्रष्टे विधान होते याची प्रचिती येते. *अधिक उणे लिहिले असल्यास क्षमस्व!* ~ उदय ग. ( ठाण ) ✒️

*Jay Shree Krishna.!🙏*


*“आईच्या गर्भात उमगली झुंजारची रीत"🚩*

*🔸१ मार्च १६३०🔸* *मुघल बादशहा शाहजहान हा मोठ्या फौजेसह बुऱ्हानपूर येथे येऊन दाखल झाल्याची बातमी शहाजीराजे यांना समजताच माँसाहेब जिजाऊ आणि बाळ शिवबांची शिवनेरी वर चोख व्यवस्था लावुन आदीलशाहीत हजर झाले.*

*❝ ⛳ - ॥ धर्मवीर बलिदान मास ॥ श्लोक क्रमांक.२💐🙇🏻♂️🚩⛳️❞* *~ दिनांक १-०३-२०२५ आज धर्मवीर छत्रपती संभाजीराजे बलिदानमासाचा दुसरा दिवस आजच्या या दुसर्या श्लोकाचा* * *अर्थ :- असंख्य संकटे , अत्याचार आपल्याला आजच्या काळातही गिळण्यास तयार आहेत , म्हणजेच आपला नायनाट करण्यासाठी सज्ज आहेत , परंतु या अशा कठीण परिस्थितीत आपण शंभूराजेंना आठवलं पाहिजे त्यांनीही अनेक अन्याय अत्याचार सहन केले मृत्यू त्यांना गिळण्यास मोठ्या ताकदीने सज्ज होता परंतु ते जराही ठगमगले नाहीत ,स्वराज्यधर्मासाठी शंभूराजे मृत्यूरुपी जळत्या रणात एखाद्या तलवारी प्रमाणे लखाकले , त्यांचा सारखा धर्मवीर पुन्हा होऊ शकत नाही , सूर्यालाही घाम फोडेल अशी दाहक त्यांची धर्मभक्ती होती , जर आपल्याही मनात अशी धर्मभक्ती जागवायची असेल तर या महान शिवपुत्राला आपण आपल्या चित्तात वसवले पाहिजे.!*

*दुसर्या दिवसाचे श्लोक आधल्या दिवशी रात्री १०:०० ला पोस्ट केले जातील.* *_उद्याचा २ रा श्लोक आज रात्री १०:०० ला पोस्ट होईल_*

*प्रणाम 🙏* स्वामी म्हणतात की, जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर पहिल्यादा संकटाशी मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिका. जीवनाचे एक सत्य आहे जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्या समोर तुम्ही उभे रहा. !! श्री स्वामी समर्थ 📿 *आपला दिवस आनंदी जावो 🌼*

*बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याबाबत छत्रपती शासन असायला हवे मात्र हे कायद्याचे शासन केवळ पैशाचा जीवावर अनेकदा चालते आणि काही काळाने गुन्हेगार सोडले जातात त्यामुळे अशा बलात्कारी वृत्तींना काहीही वाटत नाही. जोपर्यंत बलात्कारी प्रवृत्तीना भरचौकात लटकवले जाणार नाही ! त्यांचे अवयव तोडले जाणार नाहीत तोपर्यंत देशात बलात्कार हे होतच राहणार. कटू आहे पण सत्य आहे.* *#वास्तव* *#पुणे* *#स्वारगेट*