
सिध्दाश्रम सत्संग परिवार
3.8K subscribers
About सिध्दाश्रम सत्संग परिवार
सदरील चॅनल अध्यात्मिक मार्गदर्शनपर आहे. फाऊंडेशन कडुन कुठलेही वैयक्तिक फोन किंवा मेसेजेस केले जात नाहीत किंवा अंधश्रद्धा पसरवली जात नाही. चॅनल सनातन हिंदु धर्म संस्कृती मधील प्राचीन ग्रंथ, वाड्मयीन साहित्याचा अभ्यास करून साधकांना मार्गदर्शन करण्याच काम करत. सिध्दाश्रम सत्संग परिवार ही रजीस्ट्रेशन झालेली कायदेशीर संस्था आहे. या संस्थेच्या नावाखाली दंडनीय कृत्य केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
Similar Channels
Swipe to see more
Posts

मान्य आहे मला तुम्ही ध्यान आणि योग मार्गी आहात माझा पण तोच मार्ग आहे पण त्यामुळे मी तंत्रशास्त्र हा माझा प्रांतच नाही अस बोलु शकत नाही साधक म्हणुन अगोदर माझा तंत्र साधना आणि शास्त्राचा अभ्यास पुर्ण हवा तरच दैवत मदत करतात....

कुठल्याही देवतांची संतुष्टी व्यवस्थितपणे आणि क्रमानुसार करण खुप आवश्यक आहे त्यात जर उच नीच झाल तर परिणाम वेगळे होतात आणि ते सहनशक्तीच्या पलीकडे असतात....

जे स्वतःहुन अंतर प्रेरणेने चालत येतील त्यांच मनापासून स्वागतच आहे पण एकवेळ शांत बसुन विचार करा की आपल्याला नेमक जायच कुठे आहे...

अर्धवट ज्ञान यासाठी घातक असत की माणुस नंतर मेंटली पार कामातुन जातो जस रणवीर अलाहबादीयाच झाल तो कालभैरव देवता प्रचार प्रसाराच्या मागे लागला पण मेंदुच संतुलन बिघडल आणि संकटात सापडला

एक देवता सिध्द करायला कदाचित दशक सुध्दा लागु शकतात पण ती जर सिध्द झाली तर जगात कुठलीही शक्ती तुमच अनिष्ट करु शकत नाही किंवा अडथळा करत नाही.

तंत्र साधना खुपच उपयुक्त आहेत पण समोरचे साधक गंभीरपणे पाठपुरावा करणारे हवे आहेत तरच त्याचा फायदा होतो आणि हेच कारण आहे की मोजके साधकच घडवण्यावर भर आहे.....

तंत्र साधना आणि त्यावर माहिती मी इथे पण शेअर करेनच पण यामधुन तुम्ही घडणार नाहीत किंवा बारकावे फार समजणार नाहीत हजार प्रश्न उपस्थित राहतात त्याची उत्तरं फक्त समोरा समोर दिली जातात आणि ती लवकर समजतात सुध्दा....

एकच दैवत साधकांनी व्यवस्थितपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने हाताळायला सुरवात केली तर परीणाम सकारात्मक असतात.

अर्थातच साधकांना घाबरवुन परावृत्त करण्यासाठी मी हे लिहित नाही अजिबात नाही जे मला ओळखतात त्यांना माझा आशय लगेच लक्षात येईल ....