
टाकबोरू - साहित्यिक संकेतस्थळ
15 subscribers
About टाकबोरू - साहित्यिक संकेतस्थळ
नवीन लेखक आणि वाचकांचा साहित्यिक विचारमंच!
Similar Channels
Swipe to see more
Posts

१ मे १९६०. मराठी भाषिकांच्या प्रांतवार रचनेतून ‘महाराष्ट्र’ राज्याचा उदय, ही ऐतिहासिक घटना. मात्र त्यासाठी कित्येक वर्षे दिला गेलेला लढा त्यातील चढउतार याविषयी जनमानसांत आजही तितकीच आत्मीयता (आणि स्थान) आहे, जितकी शालेय शिक्षणात मराठीला! दैनंदिन वापरातही हल्ली मराठीवर आलेलं सावट आणि मुळची मराठीबाबतची अराजकीय (हा शब्द महत्वाचा) अनास्था दूर करण्यास थोडा हातभार लावावा या दृष्टीने भाषेवर प्रचंड प्रेम आणि भाषेतील तितकीच ज्ञानसंपदा यांचा सुवर्णमेळ असणाऱ्या डॉ. तारा भवाळकर यांची ‘स्पेस’ ट्विटर सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेली होती . . . ९८ व्या दिल्लीतील अखिल भारतीय मराठी भाषा संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेल्या डॉ. तारा भवाळकर यांचे मुलाखत वजा व्याख्यान वजा चर्चासत्र ऐका यूट्यूबवर . . . डॉ. तारा भवाळकर : मराठी भाषेचे वैभव आणि भविष्य https://www.takboru.com/2025/05/prosperity-of-marathi-tara-bhavlkar.html #marathi_bhasha #tara_bhvalkar #marathi_podcast _[ साहित्य आवडल्यास आपल्याला प्रियजनांना पाठवा आणि उत्तम साहित्यासाठी जोडले जा: https://whatsapp.com/channel/0029VaJM1bJ5Ui2WSObO5a36 ]_


प्राचीच्या विळख्यातून बचवला, रेडियोवर ‘आर. जे.’ म्हणून निवड झाल्याचं पत्र आलं, स्वप्नांची नगरी चार पाऊले जवळ आली. एकंदर मास मीडियात आलेल्या अपयशानंतर, बेरोजगारीनंतर, फसलेल्या प्रेम(?)प्रकरणानंतर आणि अंधारानंतर आता आयुष्य उजाडू लागलेलं चंद्रहासचं. लहान खेड्यातून शहरात आलेल्या तरुणाचं होतं तेच चंद्रहासचं होण्याआधी आवर्ताने गिळलेल्या मानसचं पत्र आलं, शेवटचं? . . . आवर्त. दोन भिन्न तरुणांची कथा. समस्या सारख्या असल्या तरी दोघांचे भितरी संघर्ष वेगळे. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कुचंबणा वेगळ्या. त्या आवर्तातून आपापला मार्ग शोधत राहण्याच्या ह्या (प्रेम)कथेचा पूर्वअंतिम भाग. वाचा; *आवर्त: एक प्रेमकथा अशीही (नऊ)* https://www.takboru.com/2025/06/avarta-special-marathi-love-story-9.html #प्रेमकथा #कथा_मालिका #आवर्त [ साहित्य आवडल्यास आपल्याला प्रियजनांना पाठवा आणि उत्तम साहित्यासाठी जोडले जा: https://whatsapp.com/channel/0029VaJM1bJ5Ui2WSObO5a36 ]


बेरोजगारी, वासनांधता, फसवा आदर्शवाद, मित्राच्या मृत्यूचे धक्के, घरच्यांचा रोष सगळे चढउतार कसेबसे नाहीसे होत आलेले चंद्रहास मुंबईचा झाला तेव्हापासून. धकाधकीतलं नावीन्य, कुतूहल आणि उद्याची आशा मावळण्याआधीच मानसचं पत्र आलं. काटा-छापा असणारे हे दोघे मैत्रीच्या नाण्यावर एकत्र! चंदूला शारिरीक सीमा ओलांडणं शक्य नव्हतं आणि मानसला त्या राखणं. पर्यायी दोघांचे काही संघर्ष एकेकट्यापुरतेच मर्यादित राहिले आणि अचानक एक दिवस एकाचा संघर्ष, कायमचा, संपल्याचं पत्र आलं . . . सुरुवात किंवा शेवट, एकाच माळेचे दोन मणी कारण, पूर्ण स्वीकार केल्याशिवाय दोन्ही गोष्टी शक्य नाहीत. आणि पूर्ण स्वीकार करण्याची क्षमता कशात असेलच तर निसर्गात. परिणामी निसर्गात एकाची आवर्तातून सुटकेस सुरुवात झाली एकाचा आवर्तात शेवट. चंद्रहास आणि मानस. सुरुवात कोणाच्या वाट्यास आली शेवट कोणाच्या कळायला मार्ग नाही . . . वाचा; अंतिम भाग आवर्त: एक प्रेमकथा अशीही (दहा) https://www.takboru.com/2025/06/avarta-special-marathi-lovestory-10.html [ साहित्य आवडल्यास आपल्याला प्रियजनांना पाठवा आणि उत्तम साहित्यासाठी जोडले जा: https://t.me/+oKyyBKEL4rc4OGE1 ]#प्रेमकथा


From where do impulses generate? We can't say, but maybe they generate from thoughts, as a violent man can't get poetic impulses. But they are connected to the subconscious too, as humans change their lives on frantic impulses. Impulses turn our worlds upside down — they are dangerous. So, should we follow them or not . . . Impulses take us where we don't want to go, which means where we are now — if we are happy — impulses got us here! Read about such an impulse I got after the surge of dopamine; *And I became the wind:* https://www.takboru.com/2025/03/a-boy-chasing-summer-dreams.html _#prose #short_story #love_ Join for more: https://whatsapp.com/channel/0029VaJM1bJ5Ui2WSObO5a36

पाश, मोहसीन, गद्दार, सफ़दार, लॉर्का, दुष्यंत ही नावे ऐकलीयेत? कवीच्या कवितेने काय होतं किंवा काय होत नाही यापेक्षा ज्वलंत प्रश्न: कोणताही तगडा कवी जिवंत न राहण्याचं कारण काय? हे कवी अकस्मात मरतात तरी कसे? असंही त्यांच्या असण्याची गरज काय? त्यांच्या नसण्यानं काय ओढावेल? वाचा 'हुकूमशाहीत'; https://www.takboru.com/2025/02/fate-of-the-chosen-poet.html #विद्रोही_काव्य #राजकीय #मुक्तक

शाळेच्या, माळावरच्या, मंदिराच्या, पीडब्ल्यूडीच्या, सोसायटीच्या किंवा पडीक जागेतल्या कोणत्याही मैदानावर बिनपगारी घाम गाळलेल्यांना काय मिळालं? चांगली शरीरयष्टी, कणखर मन आणि आठवणी यापलीकडे देखील मैदान आयुष्यात साथ देतं? कोणत्याही मैदानावर लहान मुलांवर मोठी मुले अन्याय करत असत तरीही मैदानावर आपण जात राहिलो यातून खरंच काही प्राप्त झालं? लहापणीच्या मैदानी आणि बैठ्या खेळांनी अनपेक्षितपणे कोणतं दान दिलं याचा आठवणींतून घेतलेला धांडोळा; वाचा *बालपणीचा डाव रडीचा* https://www.takboru.com/2025/02/nostalgic-childhood-games-indian-kids.html #आठवण #ललित #लेख

विकासाची सायकल नसते, विकासाचा रणगाडा असतो – चालवणारा सुरक्षित फक्त! प्रत्यक्षात रणगाड्यानं जमीन नांगरल्याचा आभास होत असला तरी अप्रत्यक्षात ते जमिनीचं उद्ध्वस्त होणं असतं. विकासाच्या व्याख्या पुन्हा वर्गानुसार बदलणार. आहे रे आहे रे, नाही रे नाही रे. चंद्राच्या चांदण्यात रोमँटिसिझम प्रत्येकाला कुठला दिसायला! रणगाड्याच्या दातऱ्यांत पिसून निघाल्यानंतर जगाकडे पाहणाऱ्याच्या पाहण्याच्या दृष्टीकोनाविषयी थोडंसं . . . विचार करा कधी हा रणगाडा चुकूनमाकून तुमच्या दवाखान्यावरून, शेतावरून, शाळा-ऑफिसावरून किंवा तुमच्या घरावरूनच गेला तर? वाचा; विकास: https://www.takboru.com/2025/02/panzer-of-false-prosperity.html #स्फुट #सामाजिक #वैचारिक

क्रोधभाव, लोभभाव, दंभभाव, मत्सरभाव, कामभाव असं वाचलंय कधी? यांना म्हणायचं रिपू मात्र प्रेमाला अन् मैत्रीला जोडायचा भाव – प्रेमभाव, मैत्रीभाव. असं का? या दोन भावनांत असं काय गौडबंगाल? त्यातही समोरील व्यक्ति भिन्नलिंगी असेल तर मैत्री आधी होते का प्रेम आधी जन्मतं यावर ‘पुढचा’ त्रास अवलंबून! त्या आल्हाददायक त्रासाबद्दल थोडंसं . . . लिहिताना विचार स्पष्ट होतात, मार्ग सापडतो म्हणून हा लेखप्रपंच. वाचा; *तुमच्यासाठी प्रेम की मैत्री?* https://www.takboru.com/2025/02/love-vs-friendship-choice.html #lalit #lekh #prem