पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र WhatsApp Channel

पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र

16.2K subscribers

About पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र

पोषण ट्रॅकर (अँप आणि डॅशबोर्ड) बाबतची अधिकृत माहिती शेअर करण्यासाठी हे चॅनेल आहे. या चॅनेलद्वारे अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांच्यापर्यंत पोषण ट्रॅकर बाबतच्या नवीन अपडेट्स, डॅशबोर्ड मध्ये झालेले बदल व इतर माहिती जलदगतीने पोचविणे सोपे होईल. पोषण ट्रॅकर संबंधीचे मार्गदर्शक व्हिडीओ मिळविण्यासाठी/बघण्यासाठी दिलेल्या चॅनेलला भेट द्या. लिंक:https://youtube.com/@poshantrackerdoot?si=iKurGjRcFM6iAUa-

Similar Channels

Swipe to see more

Posts

पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
5/30/2025, 10:23:22 AM
Post image
👍 🙏 😮 46
Image
पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
5/30/2025, 10:23:21 AM

डेव्हलपर मोड सुरू असेल तर वरीलप्रमाणे एरर येईल आणि पोषण ट्रॅकर अँपमध्ये अंगणवाडी सेविका यांना लॉगिन करता येणार नाही, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीची समस्या आपल्या जिल्ह्यात/प्रकल्पात/बीटमध्ये येईल तेव्हा संबंधित अंगणवाडी सेविका यांना डेव्हलपर मोड बंद करायच्या सूचना द्याव्यात. धन्यवाद!

👍 🙏 👌 😮 40
पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
6/14/2025, 3:01:30 AM

पोषण ट्रॅकर नवीन आवृत्ती - २३.९ या मध्ये FRS आणि वजन-उंची घेताना येत असलेल्या समस्या सोडविण्यात आलेल्या आहेत. सर्वांनी नवीन आवृत्ती डाउनलोड/अपडेट करून घ्यावी.

👍 🙏 🆗 🤣 ❤️ 😂 🥺 🙃 188
पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
5/21/2025, 6:52:50 AM

महत्वाचे, *पोषण ट्रॅकर आवृत्ती - २३.६* FRS प्रक्रियेमध्ये अंगणवाडी सेविका यांच्या सुलभतेसाठी बदल करण्यात आलेला आहे. या आवृत्तीमध्ये FRS प्रक्रिया करत असताना अंगणवाडी सेविका यांना सुलभता व्हावी म्हणून प्रक्रियेदरम्यान आधार द्वारे प्राप्त फोटो आणि अंगणवाडी सेविका यांनी काढलेला फोटो स्क्रीनवर दर्शवून अंगणवाडी सेविका यांना सत्यपित करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जेणेकरून चुकीचा फोटो काढून प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही आणि Aadhar Face Auth मध्ये प्रगती होईल. *_टीप: 6म ते 3वर्ष स्व:आधार ने नोंदनी असलेल्या मुलांच्या बाबतीत FRS मध्ये असलेली समस्या या आवृत्तीमध्ये सोडविण्यात आलेली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी._* धन्यवाद! टीम पोषण ट्रॅकर

👍 🙏 😢 ❤️ 💰 😂 👆 👌 💐 166
पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
5/30/2025, 10:23:20 AM

सर्वांना महत्वाची सूचना! पोषण ट्रॅकर अपडेट - २३.७ (नवीन आवृत्ती - पुढील 2 दिवसांमध्ये उपलब्ध होईल) *_या आवृत्तीमध्ये सुरक्षेच्या कारणाने ज्या-ज्या मोबाईल मध्ये Developer मोड सुरू असेल त्या-त्या मोबाईल मध्ये पोषण ट्रॅकर अँप वापरासाठी उपलब्ध असणार नाही._* *_त्यामुळे शासनाने दिलेल्या मोबाईल मध्ये कुणी developer मोड सुरू केलेले असेल तर खालील दिलेल्या पर्यायांचा उपयोग करून developer मोड बंद करावे._* *_Setting->Developer Option-> Toggle Button Off_* टीप:- १. नवीन आवृत्ती येणाऱ्या १-२ दिवसांमध्ये उपलब्ध होईल. २. सर्व अंगणवाडी सेविका शासनाने दिलेल्या मोबाईल मध्ये पोषण ट्रॅकर वापरत आहेत याची खात्री करावी अन्यथा यामध्ये समस्या येण्याची शक्यता आहे. धन्यवाद! टीम पोषण ट्रॅकर

👍 🙏 ❤️ 😮 👏 😉 😢 43
पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
6/11/2025, 4:47:01 AM

सर्वांनी २३.८ आवृत्ती डाउनलोड/अपडेट करून घ्यावी.

👍 🙏 🤦‍♀ ❤️ 💐 🌹 😄 😮 🤦‍♀️ 143
पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
5/31/2025, 2:31:27 AM

पोषण ट्रॅकर नवीन आवृत्ती २३.७ मध्ये झालेल्या बदलांबाबतचा मार्गदर्शक व्हिडीओ. लिंक:- https://youtu.be/7UcgIxsuVlc टीप:- कृपया सर्व अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका यांना हा व्हिडीओ पाठवावा. धन्यवाद!

👍 🙏 🇮🇳 😢 ❤️ 🇦🇬 👆 💍 😂 105
पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
5/31/2025, 2:31:27 AM

पोषण ट्रॅकर नवीन आवृत्ती - २३.७ नवीन बदल:- १. *FRS प्रकियेत नवीन सुविधा - आता लाभार्थी यांना THR दिलेला असताना देखील लाभार्थी यांचा फोटो आणि इकेवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचा पर्याय लाभार्थी यांच्या प्रोफाइल मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.* २. *आहार घेण्यास इच्छुक नाही असलेल्या लाभार्थ्यांमध्ये बदल करण्याची सुविधा* पर्यवेक्षिका यांना त्यांच्या अँपमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यासाठी अंगणवाडी सेविका यांनी विनंती पाठविणे गरजेचे आहे. ३. ३-६ वर्षाच्या बालकांसाठी *अपार आयडी* बनविण्याची सुविधा अंगणवाडी सेविका यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ४. UDID नंबर नसल्यास देखील लाभार्थी यांना दिव्यांग म्हणून नोंद करता येणार आहे ५. टीएचआर वाटप करताना येत असलेला OTP वगळण्यात आलेला आहे. ६. शाळेत जात असणारी बालके हा पर्याय निवडलेला असल्यास त्याचा परिणाम आहार घेण्यास इच्छूक नाही यावर होणार नाही. टीप:- आपल्या सुलभ संदर्भासाठी सोबत मार्गदर्शक व्हिडीओ जोडलेला आहे. धन्यवाद! टीम पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र

👍 🙏 🤗 👌 ❤️ 🎉 😙 😢 😮 80
पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
2/20/2025, 7:12:52 AM

अंगणवाडी सेविका यांनी या फिचर चा योग्य उपयोग केल्यास लाभार्थी e-KYC अंगणवाडी सेविका यांना करण्याची आवश्यकता पडणार नाही आणि लाभार्थी मोडुलबाबत जनजागृती देखील होईल.

👍 🙏 ❤️ 47
पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
2/20/2025, 7:05:29 AM

*पोषण ट्रॅकर - प्रशिक्षण व्हिडीओ* #लाभार्थी स्वतःची e-KYC कशी पूर्ण करू शकतात. आपल्या सर्वांना माहिती आहे की लाभार्थ्यांना FRS मोडुल द्वारे THR वितरित करण्यासाठी लाभार्थी यांची e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. अंगणवाडी सेविका यांचे काम सोपे व्हावे आणि लाभार्थी यांना स्वतःची e-KYC प्रक्रिया पूर्ण करता यावी यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे. अंगणवाडी सेविका यांनी लाभार्थी यांना मार्गदर्शन करून स्वतःच e-KYC पूर्ण करण्यास प्रोत्साहित करावे जेणेकरून आपले काम सोपे होईल आणि eKYC चे उद्दिष्ट देखील पूर्ण होईल. *व्हिडीओ लिंक:-https://youtu.be/Ux2Z35S2LhI* टीप:- अंगणवाडी सेविका यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व लाभार्थ्यांना हा व्हिडीओ पाठवावा जेणेकरून त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणे सोईचे होईल. धन्यवाद! टीम पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र

👍 🙏 ❤️ 🎉 😢 😮 47
Link copied to clipboard!